Kidney Infection saam tv
देश विदेश

तीव्र ताप अन् लघवीचा त्रास? २२ दिवसांत ७ चिमुकल्यांचा मृत्यू, किडनीचा नवा आजार कोणता?

Kidney Infection: मध्य प्रदेशातील छिंदवाडीत किडनीच्या संसर्गामुळे बालकांचे मृत्यू. जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट.

Bhagyashree Kamble

  • मध्य प्रदेशातील छिंदवाडमध्ये नवा आजाराचा थैमान.

  • किडनीच्या आजारामुळे चिमुकल्यांचा मृत्यू.

  • नेमकं कारण काय?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका चार वर्षांच्या मुलाचा नागपूरमधील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. किडनीच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, गेल्या २२ दिवसांत किडनीच्या संसर्गाने अशाच प्रकरणांमध्ये छिंदवाडा येथील सात मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात वाढ होत असल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत.

शनिवारी दिघवानी गावातील ४ वर्षीय विकास यदुवंशीचा नागपूरमधील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या २२ दिवसांत ७ मुलांचे याच कारणामुळे निधन झाले. विशेषत: तामिया आणि कोइलांचल भागात संसर्गाचे प्रमाण वाढले असून, काही बालकांवर अजूनही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

डॉक्टरांनी लक्षणे दिसल्यास दिसल्यास मुलांवर ताचडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. छिंडवाड्याचे जिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'ज्या रूग्णांना किडनीच्या आजारावर उपचाराची गरज आहे. त्यांना एम्स नागपूर येथे तातडीने हलवावे', असं ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. तसेच बालकांवर त्वरीत आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पटेल यांनी सांगितले की, 'आतापर्यंत १ ते ७ वर्षे वयोगटातील सात मुलांचा मृत्यू झालाय. ग आयसीएमआरचे पथक बाधित भागांचे सर्वेक्षण करून नमुने घेतले आहेत. तसेच भोपाळमधील आरोग्य पथकाने पाण्याचे नमुने गोळा करून पुणे प्रयोगशाळेत पाठवले आहे. अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल', असं ते म्हणाले.

लक्षणे कोणती-

लहान मुलांना तीव्र ताप किंवा लघवी करताना त्रास जाणवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT