BJP leader and councillor Lokesh Deharia passed away after suffering a sudden heart attack while visiting his constituency in Chhindwara. Saam tv
देश विदेश

भाजप नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; मतदारसंघात फिरताना आला हार्ट अटॅक; CCTV व्हिडिओ व्हायरल

BJP Corporator Passes Away Due to Heart Attack: छिंदवाडा येथील भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक लोकेश देहारिया यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते खाली कोसळले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Bharat Jadhav

  • भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लोकेश देहारिया यांचे निधन

  • मतदारसंघाचा दौरा करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

  • संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून एक धक्कादायक घटना घडलीय. भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लोकेश देहारिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले आहे. छिंदवाडा शहरातील प्रभाग क्रमांक ४७ (प्रियदर्शनी कॉलनी) चे नगरसेवक असलेले लोकेश देहारिया आपल्या प्रभागाचा दौरा करत होते, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लोकेश देहारिया यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले असा परिवार आहे. लोकेश देहारिया यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

मतदारसंघात फिरताना आला हार्ट अटॅक

छिंदवाडा महानगरपालिकेतील भाजपचे ४६ वर्षीय नगरसेवक लोकेश देहारिया यांचे निधन झाले. ही घटना घडली तेव्हा ते आपल्या प्रभागातील 'सिद्धिविनायक रेसिडेन्सी'समोरील रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यावरच कोसळले.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नगरसेवक लोकेश देहारिया यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. नगरसेवक लोकेश देहारिया जेव्हा रस्त्यावरून चालत होते, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अचानक जमिनीवर कसे कोसळले, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. नंतर, ते रस्त्यावर कोसळलेल्या अवस्थेत आढळल्यावर तेथून जाणाऱ्या ओळखीच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala Waterfall : धुकं, हिरवागार निसर्ग अन् खळखळणारे धबधबे, टिटवाळ्याजवळील 'हे' ठिकाण पावसाळ्यात बनते स्वर्ग

Ketan Agarwal : सिया-चेतनने गुपचूप लग्न केलं होतं? राजस्थानच्या 'त्या' मंदिरात पोलिसांच्या हाती काय लागलं?

Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेत तुफान गर्दी उसळली; गुदमरून एका भाविकाचा मृत्यू; १२० हून अधिक भाविक रुग्णालयात

श्रीकृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे; मौलाना अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, प्रभू रामचंद्रांवर बोलताना जीभ घसरली

Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT