Madhya Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेमध्ये पिकअपला भीषण अपघात झाला. भरधाव पिकअप उलटल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये ११ जण गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात

  • पिकअप उलटल्यामुळे १२ जणांचा मृत्यू

  • मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

  • मजूरांना घेऊन हा पिकअप जात असताना ही घटना घडली

मध्य प्रदेशमध्ये बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये २ लहान मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारा पिकअप अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या १२ जणांनी जागीच प्राण सोडले. मृतांमध्ये २ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपाघातानंतर घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मजूर बसले होते. अंदाजे ३० ते ३५ मजूर या पिकअपमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे. भरधाव पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातामध्ये पिकअपमधील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यातच काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये १३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

EPFO Update: बंद PF खात्याबाबत मोठी अपडेट! EPFO सुरु करणार नवी सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया...

SCROLL FOR NEXT