Accident  Saam tv
देश विदेश

Madhya Pradesh Terrible Accident: वर्ध्यातील 3 तरुणांचा भीषण कार अपघातात मृत्यू

दारू पिऊन वाहन चालवणे हे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: दारू पिऊन वाहन चालवणे हे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांची कार एका सुरक्षा भिंतीला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Terrible Accident) तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही (police) घटनास्थळी पोहोचले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा (car) जागेवरच चक्काचूर झाली आहे. गॅस कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. (Madhya Pradesh 3 youths from Wardha die horrific car accident)

हे देखील पहा-

दुसरी येथेच एक घटना घडली आहे. त्यात स्कूटीस्वार आई आणि मुलीचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूरच्या (Nagpur) वर्धा जिल्ह्यातील तुषार कांबळे, दीपक, अक्षय आणि प्रदीप हे ४ युवक भगवान शंकराच्या दर्शनाकरिता चौरागढच्या टेकडीवर जात होते. दमुआजवळ असलेल्या झरीघाट वळणावर त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि सुरक्षा भिंतीला जोरात धडकली होती. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ जण जखमी झाला आहे. सर्व तरुण दारूच्या नशेत होते. यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात (Accident) झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT