मध्यप्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूपूर्वी तिनं एक चित्र काढलं होतं. नंतर तिनं आयुष्य संपवलं. घराचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद करून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, तरूणीनं हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही घटना शुक्रवारी आझाद नगर पोलीस स्टेशन परिसरातील मुसाखेडी येथील चौधरी पार्क कॉलनीतून समोर आली आहे. राधिका दुबे (वय वर्ष १७) असे मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी घरात एकटीच होती. जेव्हा कुटुंब कामावरून घरी परतले तेव्हा राधिकाचा मृतदेह लटकलेला पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला.
कुटुंबाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोलिसांनी घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र, भिंतीवर दोन चित्र दिसली. या चित्रात एक मुलगी एका हाताने निरोप देताना दिसत आहे. दुसऱ्या पेटिंगमध्ये डोंगर आणि शांत परिसर रेखाटले आहे. या दोन्ही चित्रांचा नेमका अर्थ काय? याचा तपास सुरू आहे.
राधिका इयत्ता अकरावीत शिकत होती. अभ्यास की आणखी कोणत्या कारणामुळे तिनं आयुष्य संपवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमची मुलगी शांत स्वभावाची होती. परंतु, गेल्या काही दिवसापासून तिच्या वागण्यात थोडासा बदल दिसून येत होता. तिला कलेची आवड होती. 'गुडबाय' या चित्रामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे'.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहे. राधिकाचा मोबाईल फोन, नोटबूक आणि दोन्ही पेंटिग्ज जप्त केले आहेत. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, शिक्षक आणि कुटुंबाची चौकशी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.