Stampede in RCB Victory parade  Saam tv
देश विदेश

Stampede in RCB Victory parade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट; चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

Stampede in RCB Victory parade update : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे.

Vishal Gangurde

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या जल्लोषाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. या चेंगराचेंगरीत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये १८ वर्षानंतर आरसीबीने चषक जिंकला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमा झाले होते. या स्टेडियमबाहेर लोकांना नीट उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. या स्टेडियमबाहेरच चाहत्यांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

चेंगराचेंगरीच्या या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरुतील ही चेंगराचेंगरीची घटना गेट नंबर-१ जवळ घडली आहे. स्टेडियमवर पोहोचण्याआधी आरसीबीचे खेळाडू कर्नाटका विधानसभेत गेले होते. तिथे कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनी आरसीबीच्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला. त्यानंतर खेळाडूंची बस चिन्नास्वामी स्डेडियकडे निघाली. आरसीबीच्या विजयी रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसंदर्भातील सूचना प्रशासनाने जारी केल्या होत्या.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोशिएशनद्वारे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर सुरक्षादलाने आरसीबीच्या संघाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. चेंगराचेंगरीचा पहिली व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये युवक एकमेकांच्या अंगावर पडल्याचे दिसत आहे. काही जण जखमींना रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT