Ludhiana Crime News Saam TV
देश विदेश

Ludhiana Crime News: हत्येनंतर मृतदेह बेडमध्ये ठेवून लावली आग; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Crime News: कुणाला कसलाही सुगावा लागूनये यासाठी मामाचा मृतदेह लाकडी बेडमध्ये ठेवून तो जाळण्यात आलाय.

Ruchika Jadhav

Crime News: गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रेमप्रकरणातून मुलींची क्रूरपणे हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. निर्घृण हत्येची अशीच आणखीन एक घटना पंजाब येथे घडली आहे. या घटनेत आरोपी महिलेने चुलत भावांच्या सहाय्याने आपल्याच मामाची हत्या केली आहे. या खुनाचा कसलाही सुगावा लागूनये यासाठी मामाचा मृतदेह लाकडी बेडमध्ये ठेवून तो जाळण्यात आलाय.

सदर घटना पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. खेरी-ठाकरवाल या गावात मृतदेह लाकडी बेडमध्ये ठेवून जाळण्यात आला. बेडला आग लावून आरोपींनी तेथून पळ काढला. आपली या सगळ्यातून सुटका झाली असं त्यांना वाटलं. मात्र जळत असलेल्या बेडच्या बॉक्सवर काहींची नजर पडली. अज्ञात ठिकाणी बेडला आग कुणी लावली म्हणून काही व्यक्ती बेडच्या थोड्या जवळ गेल्या. त्यावेळी जे दिसलं ते पाहून त्यांचं काळीज हादरलं.

गावकऱ्यांनी पाहिला जळणारा बेड

त्यांनी पाहिलं की लाकडी बेडमध्ये एक व्यक्ती देखील जळत आहे. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची माहिची तात्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आपला तपास सुरु केला. एकएक पुरावा शोधत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतलाय.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पितळ उघडं पडलं

पोलिसांनी या विचित्र घटनेचा तपास सुरु केला. यावेळी सुरुवातीला त्यांनी बेड जळत असलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यामुळे त्यांनी आजुबाजूच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पोलिसांना दोन व्यक्ती आपला चेहरा झाकून सायकलवर जात होत्या. सायकलवर त्यांनी एक बेड देखील ठेवला होता. जळत असेला बेड आणि सीसीटीव्हीत दिसत असलेला बेड एकच आहे, असं लक्षात आल्यावर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव गुरदीप सिंग (वय ६१) आहे. या प्रकरणी जशनप्रीत कौर या महिलेसह सुखविंदर सिंग आणि त्याचा मित्र योगेश कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. मामा आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार करत महिलेने हत्येचा कट रचला. तिने आपल्या भावांना ५० हजार रुपये देऊन मामाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT