cylinder price hike  Saam tv
देश विदेश

देशात उडाला महागाईचा भडका; LPG सिलिंडर २६१ रुपयांनी महागला

5 kg lpg cylinder price hike : देशात महागाईचा भडका उडाली आहे. LPG सिलिंडर २६१ रुपयांनी महागला आहे.

Vishal Gangurde

व्यावसायिका सिलिंडरनंतर ५ किलोचा सिलिंडरच्या दरात वात

५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात २६१ रुपयांनी वाढ

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना झटका

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांनी वाढल्यानंतर आता ५ किलोच्या सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या दरात २६१ रुपयांनी महागला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचा फटका रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. परंतु एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ३३ कोटी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलो ग्रॅमचा व्यावसायिक सिलिंडर ९९३ रुपयांनी महागला आहे. या गॅस सिलिंडरचा दर ३,०७१.५० रुपये इतका झाला आहे. ५ किलो फटीएल सिलिंडर २६१ रुपयांनी वाढून १७५४.५ रुपये इतका झाला आहे. सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा दिलासा मिळावा, यासाठी घरगुती सिलिंडरसाठी सबसिडी सुरुच ठेवली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

किंमती का वाढल्या?

पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढल्या आहेत. कच्चा तेलाचा बॅरल १२६ प्रति बॅरल इतक्या किंमतीवर पोहोचला आहे. या बॅरलचा भाव शुक्रवारी ११२ डॉलर इतक्या किंमतीवर पोहोचला. भारत एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.

१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दरवाढीचा अतिरिक्त भार ग्राहकांवर ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थाच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळू शकतात. छोटी दुकाने, घरात वापरण्यात येणारा ५ किलोचा एफटीएल सिलिंडरवर कोणतीही सबसिडी देण्यात आलेली नाही.

सरकारने या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या महिन्यात १६ टक्के पेट्रोलियम उत्पादकात वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT