LPG cylinder  saam tv
देश विदेश

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

LPG rule change: एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यादरम्यान केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार ५ किलोचे सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थी, स्थलांतरीत कामगार आणि प्रवासी यांना होणार आहे.

Priya More

Summary -

  • केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

  • ५ किलोचे छोटे LPG सिलिंडर बाजारात येणार

  • स्थलांतरित, विद्यार्थी आणि छोट्या वापरकर्त्यांना फायदा

  • आधार केवायसी अनिवार्य होण्याची शक्यता

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसत आहे. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढत चालला आहे. यावर केंद्र सरकारकडून वेगवेगळी महत्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. अशातच आता केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिक, स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहे.

पेट्रोलियम मंत्रालय लवकरच ५ किलो ग्रॅमचे छोटे सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहेत. या सिलिंडरमुळे गॅस कनेक्शन नसलेल्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार बाजारामध्ये ५ किलोग्रॅम वजनाचे छोटे सिलिंडर आणण्याची तयारी करत आहे. या सिलिंडरचा फायदा खास करून प्रवासी, मजूर आणि विद्यार्थ्यांना होईल. यासंदर्भातली अधिसूचना येत्या एक ते दोन दिवसांत जारी होण्याची शक्यता आहे. हे छोटे सिलिंडर खरेदी करताना ग्राहकांना आधार केवायसी अनिर्वाय केले जाऊ शकते. या नियमामुळे सिलिंडरची साठेबाजी आणि अवैध खरेदी-विक्री थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

छोटा गॅस सिलिंडर तुम्हाला गॅस कनेक्शनशिवायही मिळवता येईल. हा सिलिंडर ग्राहकांना आधारकार्ड दाखवून खरेदी करता येईल. या सिलिंडरचा पुरवठा गॅस एजन्सीमार्फत केला जाईल. साठेबाजी आणि फसवणूक रोखण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर देखील केला जाऊ शकतो. प्रत्येक छोट्या गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड किंवा विशिष्ट ओळख क्रमांक लावला जाईल. एलपीजीचा दर १०० रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आला आहे. सध्या खुल्या बाजारात हा सिलिंडर खरेदी करताना प्रति किलो २०० ते २५० रुपये द्यावे लागतात.

दरम्यान, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर छोटो सिलिंडर वापरले जातात. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद पडले आहेत. अशामध्ये हे छोटे सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास त्यांचा व्यवसाय सुरू राहिल. अशामध्ये रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये अवैधपणे गॅस भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा दुकानदारांविरुद्ध मोहीम राबवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT