Girlfriend-Boyfriend Love Affair / File Saam TV
देश विदेश

Crime News : प्रेमाचा भयंकर शेवट! ब्रेकअप करत नव्हता म्हणून गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन्...

ब्रेकअप करत नाही म्हणून गर्लफ्रेंडनेच बॉयफ्रेंडला संपवल्याची घटना समोर आली आहे.

Nandkumar Joshi

Crime News Latest : तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये धक्कादायक घटना उघड झाली आहे. तिरुवअनंतपुरम येथे वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडनेच बॉयफ्रेंडची हत्या केली. गर्लफ्रेंडला हे प्रेमप्रकरण संपुष्टात आणायचं होतं. मात्र, बॉयफ्रेंडला तिला सोडायचं नव्हतं. त्यामुळे तिने विष पाजून त्याची हत्या केली.

२३ वर्षीय तरुणीने सुरुवातीला गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांसमोर आरोपी तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आले.

२३ वर्षीय तरूण शैरोन राज हा तिरुवअनंतपुरम येथे रेडियोलॉजीचं शिक्षण घेत होता. त्याचा मृत्यू २५ ऑक्टोबर रोजी झाला होता. ३१ ऑक्टोबरला त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. राजच्या गर्लफ्रेंडने त्याची विष पाजून हत्या केली. एडीजीपी अजित कुमार यांनी या घटनेची माहिती दिली. (Crime News)

राज याची हत्या त्याची गर्लफ्रेंड ग्रीष्मा हिने केली. आठ तास चौकशी केल्यानंतर तिने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिला राजसोबतचं नातं तोडायचं होतं. मात्र, ते राज याला मान्य नव्हते. त्यामुळे तिने त्याची विष पाजून हत्या केली. (Police)

घरी बोलावून बॉयफ्रेंडला पाजलं विष

पोलिसांनी सांगितले की, १४ ऑक्टोबर रोजी ग्रीष्मा हिने राज याला घरी बोलावून घेतले. तिने घरी द्रवपदार्थात विष मिसळून ठेवले होते. तेच राज याला प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर राजला उलट्या झाल्या. त्यानंतर तो आपल्या मित्राच्या घरी गेला. त्याच्या हत्येचा कट आधीच आखला होता. राज याचा भाऊ वारंवार ग्रीष्माला फोन करून त्याला काय प्यायला दिलं याबाबत विचारणा करत होता. मात्र, ती काहीच सांगायला तयार नव्हती. तिने त्यावेळी सांगितलं असतं तर, राजचा जीव वाचला असता.

यापूर्वीही अनेकदा केला होता मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, राज आणि ग्रीष्मा ही गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी फेब्रुवारीत दोघांमध्ये बिनसलं. त्याचवेळी तिचं लग्न अन्य एका तरुणाशी ठरलं होतं. त्यानंतरही दोघांनी नातं कायम ठेवलं होतं. अलीकडेच पुन्हा दोघांमध्ये वाद झाला होता. तिला हे नातं तोडायचं होतं. त्यामुळे तिने त्याची हत्या करण्याचा कट रचला होता. यापूर्वीही तिने राज याला मारण्याचे प्रयत्न केले होते, अशी माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, जर्मनीतील नोकरी सोडली; UPSC दिली; आधी IPS नंतर IAS; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, दीड वर्षात 40 हजारांहून अधिक नागरिक जखमी

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT