Loksabha Election  Saam Tv
देश विदेश

Loksabha Election: यावर्षी विधानसभांसोबतच लोकसभा निवडणुका होणार?, भाजपकडून विचार सुरू

Priya More

Delhi News: यावर्षी देशामध्ये विधानसभा निवडणुकांसोबतच (Vidhansabha Election) लोकसभा निवडणूक (Loksabha Elaction) होण्याची चिन्ह दिसत आहेत. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडच्या (Chhattisgarh) विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणूक होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. विधानसभेसोबत लोकसभेची देखील निवडणूक घेण्याबाबत भाजप (BJP) विचार करत आहे. ऐवढच नाही तर भाजपने तयारी देखील सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे.

2024 च्या एप्रिल महिन्याऐवजी चार महिने आधीच म्हणजे 2023 च्या अखेरीसच लोकसभेची निवडणूक होऊ शकते. याच वेळी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकार 9 वर्षांच्या कामगिरीची प्रसिद्धी करण्यावर भर देत आहे, अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी नड्डा यांना विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभा निवडणुका घेतल्यास पक्षाची स्थिती कशी राहील, याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील पराभवानंतर आता इतर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप पक्ष आता तयारीला लागला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामगिरीची प्रसिद्धी केली जात आहे. तसंच प्रचाराचा फोकस देखील मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या घोषणेवर आहे.

अशामध्ये अशी देखील माहिती सांगितली जात आहे की, पीएम मोदी यांच्या संपर्कात असलेल्या भाजप नेत्यांच्या मते जोपर्यंत मोदींना भाजपच्या विजयाची शंभर टक्के खात्री वाटत नाही. तोपर्यंत एप्रिल 2024 च्या आधी ते लोकसभेची निवडणूक घेणार नाहीत. तसंच, या राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्या तर त्याचा राजकीय फायदा किंवा तोटा किती आहे याचे देखील मूल्यमापनही भाजपकडून केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसंच, या तीन राज्यांमध्ये जर स्वतंत्र विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी वेगळा निकाल आल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीवर विपरीत परिणाम होऊ नये आणि पीएम मोदी यांच्या किरिष्म्यावर निवडणूक लढवल्यासही तिन्ही राज जिंकता येतील. त्यामुळे लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकांसोबतच घेण्यात याव्यात असे मत भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT