गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयके सादर केली.
त्यानंतर सभागृहामध्ये विरोधकांनी विरोध केला. यादरम्यान गदारोळ झाला.
तेव्हा मारहाण झाल्याचा आरोप महिला खासदार मिताली बाग यांनी केला आहे.
Lok Sabha News : लोकसभेमध्ये बुधवारी (२० ऑगस्ट) केंद्र सरकारच्या नव्या विधेयकावरुन बराच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना ३० दिवस तुरुंगामध्ये राहिल्यास त्यांच्या पदावरुन काढून टाकण्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात एक विधेयक मांडले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकण्यात आल्या. काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी या विधेयकाला असंवैधानिक म्हटले. या गोंधळदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या एका महिला खासदाराने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर गंभीर आरोप केले.
सभागृहामध्ये गोंधळ झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार मितासी बाग आणि शताब्दी रॉय यांनी भाजप खासदार किरेन रिजिजू आणि रवनीत सिंह बिट्टू यांनी लोकसभेमध्ये महिला खासदारांवर हल्ला केला आणि त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.
'आम्ही विधेयकाविरुद्ध निषेध करत असताना, केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि किरण रिजिजू यांनी अचानक माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला ढकलले. यात मी जखमी झाले आहे. किरेन रिजिजू यांनी मला मारहाण केली. त्यांनी महिलांवर जोरात हल्ला केला. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार मिताली बाग यांनी निवेदनात म्हटले.
लोकसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयक सादर केली. यामध्ये संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक यांचा समावेश आहे. सभागृहाने तिन्ही विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढील संसद अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत समिती अहवाल सादर करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.