राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी -
बिहार 50.79%
चंडीगढ़ 62.80%
हिमाचल प्रदेश 67.67%
झारखंड 69.59%
ओडिशा 63.57%
पंजाब 55.86%
उत्तर प्रदेश 55.60%
पश्चिम बंगाल 69.89%
करीरोड, बीडीडी चाळ, आणि लोअर परळ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार ६ जून आणि शुक्रवार ७ जूनदरम्यान १७ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तानसा जलवाहिन्यांव्या दुरुस्तीकामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाय. गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम चालणार आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून आवाहन.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३४% मतदान
राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी -
बिहार ४८.६८%
चंडीगढ़ ६२.८०%
हिमाचल प्रदेश ६६.५६%
झारखंड ६७.९५%
ओडिशा ६२.४६%
पंजाब ५५.२०%
उत्तर प्रदेश ५४.००%
पश्चिम बंगाल ६९.८९%
अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईने स्वतःचे रक्त दिल्याची कबुली दिली आहे.
आई शिवानी आणि वडील विशाल दोघांनी मिळून हा कट रचला होता.
शिवानी आणि विशाल हे दोघे ही ससून रुग्णालयात अपघाता दिवशी उपस्थित होते.
ससूनच्या सीसीटीव्हीत विशाल अग्रवाल ही आढळला होता
माझा मुलगाच गाडी चालवत होता, याची ही आई-वडिलांनी चौकशीत कबुली दिली आहे.
आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत आणि आमच्या सूचना त्यांच्या समोर ठेवणार आहोत
उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे
ब्यालेत पेपर ची मतमोजणी आधी करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत
जनतेचा सर्व्हे आमच्याकडे आहे, सरकारी सर्व्हे त्यांच्याकडे आहे
आम्ही एक आहोत, एक राहू
आधीच कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत
आज सर्वांनी एकत्र आम्ही चर्चा केली
भाजप आणि त्यांचे सहकारी आज एक्झिट पोल ची चर्चा करतील
ते जो naretivh देण्याचा प्रयत्न करतील त्याची खरी माहिती आम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे
INDIA आघाडी देशात २९५+ जागा जिंकेल, यात कुठलाही बदल होणार नाही
हा जनतेचा आकडा आहे
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 8 राज्यांतील 57 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात पंजाबमधील 13 लोकसभा, हिमाचल प्रदेशच्या चार, उत्तर प्रदेशच्या 13, पश्चिम बंगालच्या 9, बिहारच्या 8, ओडिशाच्या 6, झारखंडच्या 3 आणि केंद्राच्या लोकसभेच्या एका जागेवर मतदान होत आहे.
मतदानाची टक्केवारी
बिहार - 42.95 टक्के चंदीगड - 52.61 टक्के हिमाचल प्रदेश - 58.41 टक्के झारखंड - 60.14 टक्के ओडिशा - 49.77 टक्के पंजाब - 46.38 टक्के उत्तर प्रदेश - 46.83 टक्के पश्चिम बंगाल - 58.46 टक्के
सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची मोठी बैठक सुरू झाली आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालही काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या घरी पोहोचले आहेत.
राज्यनिहाय झालेलं मतदान टक्केवारी -
बिहार - ३५.६५%
चंदिगढ - ४०.१४%
हिमाचल प्रदेश - ४८.६३%
झारखंड - ४६.८०%
ओडिसा -३७.६४%
पंजाब - ३७.८०%
उत्तर प्रदेश - ३९.३१%
पश्चिम बंगाल - ४५.०७%
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींकडून समारोपीय डिनरच आयोजन करण्यात आले आहे. 5 जूनला रात्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदी आणि सर्व मंत्रिमंडळाला जेवणाच निमंत्रण देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा ४ जूनला निकाल लागणार आहे.
मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणार आज संध्याकाळी बैठक पार पडणार आहे.
कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी सूर्यपूजनाने सुरुवात केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. हातात जपमाळ घेऊन मंडिक यांची प्रदक्षिणा केली.
जालना जिल्ह्यात भीषण अशा दुष्काळाच्या झळा बसत असून जवळपास 3500 हेक्टर वरील फळबागा नष्ट झाल्यात. त्यापैकी अडीच हजार हेक्टर मोसंबी बागा जळाल्याच समोर आलंय. जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल दिला असून जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल मदत आणि पुनर्वसन विभागाकडे सादर केला आहे. अनेक शेतकरी पाण्या अभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत असून दुष्काळा मुळे या फळबागा करपून गेल्याच भीषण दृश्य शेत शिवारात पाहायला मिळतेय.
पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वर येथील एमपीजी हॉटेल सील
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची मोठी कारवाई
अनधिकृत बांधकाम आणि शासकीय मिळकतीचा दुरुपयोग यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी तक्रार केली होती
तक्रारीनंतर आता हे हॉटेल सील करण्यात आले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी कोलकाता येथील केंद्रावर मतदान केलं. मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो हक्क आपण बजावायलाच हवा. सर्वच जण मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. मतदान प्रक्रिया चांगल्या पद्धतीने आणि शांततेने पार पडत आहे. चांगलंच काही होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नागपूर - रत्नागिरी महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
शिये भूयेवाडी, भुये या परिसरातील पानंद रस्ता बंद
नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांना पर्यायी रस्ता नाही
ठेकेदारासह अधिकाऱ्यांना धरले धारेवर, शेतकरी आक्रमक
Mumbai News : इंडिगो फ्लाइट 6E 5314 चैन्नई-मुंबई विमानात बॉम्ब असल्याची धमकी विमान मुंबईत उतरताच सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले. विमान सुरक्षित ठिकाणी नेऊन तपासणी सुरू
पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. बोगस मतदान होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असून, कोलकाता नॉर्थ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार तापस रॉय यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. कोलकाताच्या मतदान केंद्राबाहेरच हा राडा पाहायला मिळाला. तर भाजपचे उमेदवार तापस रॉय यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्रावर उपस्थित होता, मला बोगस मतदानाबाबत काहीच कल्पना नाही, असं रॉय यांनी सांगितलं.
पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, "जनतेने संविधान वाचवण्यासाठी मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाकडे लक्ष नाही. सध्या त्यांचे फोटोशूट सुरू आहे. यंदा बिहार धक्कादायक निकाल लागणार आहे. आम्ही ३०० जागांचा आकडा नक्कीच पार करू"
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ११.३१ टक्के मतदान झालं आहे.
बिहार- 10.58%
चंदीगड-11.64%
हिमाचल प्रदेश- 14.35%
झारखंड- 12.15%
ओडिशा- 7.69%
पंजाब- 9.64%
उत्तर प्रदेश-12.94%
पश्चिम बंगाल-12.63%
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना रणौतने मतदान केले. या जागेवरून काँग्रेसने विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी किशन यांनी आपल्या पत्नीसह मतदान केले. निवडणुकीत आपला मोठ्या फरकाने विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरूर येथील मतदान केंद्रावर पत्नीसोबत मतदान केले. 'आप'ने येथून गुरमीत सिंग मीत हैर यांना उमेदवारी दिली आहे.
भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी लोकसभेच्या सातव्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावला. कोलकाता येथील बेलगाचिया मतदान केंद्रावर जाऊन मिथुन चक्रवर्ती यांनी मतदान केले.
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि सारण लोकसभा मतदारसंघातील आरजेडी उमेदवार रोहिणी आचार्य यांनी पाटणा येथे मतदान केले.
येत्या ४ जूननंतर इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार, असा दावा केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला. मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुप्रिया पटेल यांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, "मिर्झापूरचा सर्वसामान्य नागरिक मला पुन्हा एकदा आपल्या भरघोस मताधिक्यांनी निवडून देतील".
"येत्या ४ जून रोजी एनडीएला बहुमत मिळेल. त्याचबरोबर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. इंडिया आघाडीत मोठी फूट पडेल", असा दावाही त्यांनी केला.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर चढ्ढा म्हणाले की, आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा महान सण आहे. आज मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. आज देशवासियांनी दिलेला प्रत्येक मत या देशाची दिशा आणि स्थिती काय असेल हे ठरवेल. आपल्या देशाची लोकशाही किती मजबूत असेल हे आज देशातील जनता आपल्या मतांच्या बळावर ठरवेल. प्रदीर्घ संघर्षानंतर देशवासीयांना मतदानाचा अधिकार मिळाला. आज माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे मत द्या.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी मतदानाचा हक्क बजावला. आनंदपूर साहिब मतदारसंघांतर्गत लखनौच्या साहिबजादा अजित सिंह नगर येथील मतदान केंद्रावर जाऊन चड्डा यांनी मतदान केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर नड्डा म्हणाले की, आज मला माझ्या मूळ गावी विजयपूर येथील बूथवर येऊन मतदान करण्याचा बहुमान मिळाला आहे. सशक्त, सक्षम आणि स्वावलंबी भारतासाठी मतदान करा. लोकशाही बळकट करा. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावा.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. राय यांनी याआधीही दोनदा पंतप्रधान मोदींना या जागेवर आव्हान दिले आहे. दोन्ही वेळा नरेंद्र मोदींनी अजय राय यांचा पराभव केला आहे. यंदा दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या नेत्यांची आज राजधानी नवी दिल्लीत बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार
४ जूनला होणाऱ्या मतमोजणी दिवशी काय खबरदारी घ्यावी यावर बैठकीत चर्चा होणार
सोबतच, लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा बैठकीत घेतला जाणार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. या टप्प्यात ७ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.