Government on Bank Loan Repayment SAAM TV
देश विदेश

Loan Repayment : जबरदस्ती कर्जवसुली करणाऱ्या बँकांना अर्थमंत्र्यांनीच दिली 'वॉर्निंग'; म्हणाल्या...

Nirmala Sitharaman on Bank Loan Repayment : कर्जवसुलीसाठी बँकांकडून सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.

Nandkumar Joshi

Government on Bank Loan Repayment : कर्जवसुलीसाठी बँकांकडून सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. खासगी किंवा सरकारी बँकांनी कर्जवसुली करताना कठोर पावलं उचलू नयेत, असे सीतारामन म्हणाल्या.

कर्जवसुलीसाठी विविध बँकांकडून सामान्य नागरिकांकडे तगादा लावला जातो. तशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यासंदर्भात मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अशा बँकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. (Tajya Marathi Batmya)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) एका खासदारानं कर्जवसुलीसाठी (Loan) बँकांकडून सर्वसामान्यांना धमकावणे किंवा वेगवेगळे हातखंडे वापरले जात असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले. सरकार त्याबाबत कार्यवाही करत आहे. सर्व बँकांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सीतारामन?

' काही बँका कशाप्रकारे कर्जदारांशी निर्दयीपणे वागतात यांसदर्भात माझ्याकडेही तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांना दिशानिर्देश देण्याचे आदेश सरकारच्या वतीने आरबीआयला दिले आहेत. सरकारी बँका असो वा खासगी बँका, त्यांनी कर्जवसुलीसाठी अशा प्रकारची कठोर पावले उचलू नयेत. कर्जवसुलीसाठी कर्जदारांकडे गेलात तर मानवता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन कार्यवाही केली पाहिजे,' असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT