Crime News Saam TV
देश विदेश

Delhi Crime : हे कसलं प्रेम? नवऱ्याला साेडून ६ वर्ष राहत हाेती एकत्र, लिव्ह-इन पार्टनरने जाळलं जिवंत

लिव्ह-इन पार्टनरला तारपीन तेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Shivani Tichkule

Delhi Crime News : देशभरात निक्की यादव हत्याकांड प्रकरण अजूनही शांत झाले नाही तोच देशाची राजधानी दिल्लीतून आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने तिच्यावर तारपीन तेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहित असं आरोपीचं नाव आहे.

या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. जिथे सोमवारी महिलेचा मृत्यू झाला. मृत पीडितेचे तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत भांडण झाल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. संबंधित महिला आणि मोहित गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.

महिलेने मोहितला आपल्या मित्रांबरोबर अंमली पदार्थांचे सेवन करताना बघितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की मोहितने रागाच्या भरात महिलेवर तारपीनचं तेल टाकून तिला जिवंत जाळले.

या घटनेनंतर स्थानिकांनी महिलेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखले केले. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिला तिच्या पहिल्या पतीला सोडून गेल्या 6 वर्षांपासून मोहित नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. महिलेला आठ वर्षांचा मुलगा तर चार वर्षांची दोन मुलगी आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) आरोपी मोहितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT