BJP On AAP Saam Tv
देश विदेश

BJP On AAP: पंजाबमध्ये दिल्लीपेक्षा मोठा दारू घोटाळा, ईडीने तपास करावा; भाजपचा गंभीर आरोप

Punjab News: दिल्लीतील कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपने आपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

Satish Kengar

BJP On AAP:

दिल्लीतील कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपने आपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पंजाबच्या आप सरकारने राज्यातील उत्पादन शुल्क धोरणाबाबत कट रचून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला.

राघव चढ्ढा यांच्यासह केजरीवाल यांनी नेमलेल्या लोकांची यामध्ये काय भूमिका आहे, हे शोधण्यासाठी येथेही ईडीची चौकशी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पंजाबचे उत्पादन शुल्क धोरण हे दिल्लीच्या आता बंद झालेल्या धोरणापेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. जाखड म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केजरीवालांच्या लोकांना मुख्यमंत्री कोट्यातील पॉश सेक्टरमध्ये मोठी घरे देऊन प्रॉक्सीद्वारे राज्याची लूट करण्याची परवानगी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील जाखड म्हणाले की, आप सरकारच्या हातून पंजाबला आणखी नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी पंजाबच्या उत्पादन शुल्क धोरणाची ईडीकडून चौकशी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार राघव चढ्ढा यांना केजरीवाल यांच्या भ्रष्ट कारभाराची माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला.  (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''चड्ढा नेत्र उपचाराच्या बहाण्याने अचानक परदेशात पळून जाण्यामागे हेच कारण आहे, नाहीतर असा कोणता आजार आहे, ज्याचा उपचार भारतात शक्य नाही? आता भगवंत मान खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आहेत. कारण आतापर्यंत ते डमी मुख्यमंत्री होते, तर केजरीवाल आणि त्यांचे दिल्लीतील लोक सरकार चालवत होते.''

दरम्यान, कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी अटक केली. यानंतर त्यांना आज न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT