Delhi Liqour Policy Case Saam Tv
देश विदेश

Liquor Policy Scam : मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तपास यंत्रणेला ८ महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश

Bharat Jadhav

Liquor Policy Scam Manish Sisodia :

दारू घोटाळाप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालायाने दणका दिलाय. सर्वोच्च न्यायायलाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे २४७ दिवसांपासून तुरुंगात आहेत. सिसोदिया यांच्यावर दिल्ली दारू निती धोरणात भ्रष्टाचार आणि मनी लॉड्रिंगचे आरोप असून त्यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. (Latest News)

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने ३३८ कोटी रुपयांची मनी लॉड्रिंग झाल्याचं संशय येत असल्याचं म्हटलंय. तसेच तपास यंत्रणेने ६ ते ८ महिन्यात पूर्ण करावा, असं निर्देशही न्यायालयाने दिलेत. जर या कालावधीत तपास पूर्ण झाला नाही तर सिसोदिया पुन्हा जामिनाचा अर्ज करू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. वी. एन भट्टी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. दरम्यान खंडपीठाने १७ ऑक्टोबरला दोन्ही याचिकांवरील निर्णय स्थगित केला होता. या दिवशी न्यायालयाने ईडीला सांगितलं होतं की, दिल्लीच्या उत्पन्न धोरणात बदल करण्यासाठी देण्यात आलेली लाच ही गुन्ह्यातील कमाईचा भाग होत नसेल, तर सिसोसदिया यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप सिद्ध करणे तपास यंत्रणेसाठी कठीण जाईल.

दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखेने राज्य उत्पन्नातील धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान ईडीने सीबीआयने केलेल्या तपासाच्या आधारावर मनी लॉड्रिंग प्रकरणी ९ मार्ज रोजी तिहारच्या तुरुंगात चौकशी केली होती. त्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती.

दारू घोटाळ्यात आतापर्यंत काय- काय घडलं

  • नोव्हेंबर २०२१ - दिल्ली सरकारने नवीन दारू धोरण तयार केलं होतं. त्यात दारू विक्रीच्या पद्धतीत बदल करण्यात आलं होतं.

  • जुलै २०२२ - या धोरणात काहीतरी गडबड झाल्याचां संशय आल्यानंतर दिल्लीचे राज्यपाल यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने राज्य उत्पन्न धोरण मागे घेतलं होतं.

  • ऑगस्ट २०२२ - धोरणात काहीतरी गडबड झाल्याच्या संशयावरुन सीबीआयने गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रकरणी एफआयआर दाखल केली. मनीष सिसोदियासह १४ जणांना या आरोपी करण्यात आलं.

  • नोव्हेंबर २०२२ - सीबीआयने ७ लोकांविरुद्धात चार्जशीट दाखल केली. यात दारू व्यावासायिक हे मध्यस्थी होते.

  • डिसेंबर २०२२ - दिल्लीच्या न्यायालयाने सात लोकांविरुद्धात सीबीआय चार्जशीटची दखल घेत हे प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले.

  • ८ फेब्रुवारी २०२३ रोजी तेलगांणाच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी कविता यांचे माजी सीए बुचीबाबू गोरंतला यांना सीबीआयने अटक केली होती. दरम्यान सिसोदिया यांच्या घोटाळ्यात ज्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील काही लोकांची बुचीबाबू यांनी भेट घेतली होती.

१९ फेब्रुवारी २०२३ - रोजी मनीष सिसोदिया यांना समन्स पाठवण्यात आले होते. परंतु अर्थ संकल्प चालू असल्याने ते चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते.

२६ फेब्रुवारी २०२३ रोजी सिसोदिया यांना अटक करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

SCROLL FOR NEXT