Sonam Wangchuk Hunger Strike Saam Tv
देश विदेश

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांनी 21व्या दिवशी सोडलं उपोषण, काय आहेत त्यांच्या मागण्या?

Sonam Wangchuk Hunger Strike: लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी 21 दिवसानंतर त्यांचं उपोषण सोडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sonam Wangchuk Hunger Strike:

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी 21 दिवसानंतर त्यांचं उपोषण सोडलं आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. 21 दिवस मीठ आणि पाण्यावर उपोषण केल्यानंतर आज वांगचुक यांनी उपोषण सोडताना आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, 'मी लडाखच्या घटनात्मक रक्षणासाठी आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढत राहीन.' यावेळी केंद्रशासित प्रदेशातील विविध भागांतून आज हजारो लोक एकत्र आले होते. यातच महिलांच्या एका गटाने सांगितले की, ते या मागण्यांसाठी आता उपोषण करणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनम वांचुक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहनही केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांची तब्येत खूपच खालावली दिसत आहे. त्यांनी लडाखच्या लोकांना राष्ट्रहितासाठी यावेळी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.  (Latest Marathi News)

लडाखबाबत सोनम वांगचुक यांच्या या आहेत मागण्या

1. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, अशी सोनम वांगचुक यांची मागणी आहे.

2. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.

3. लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागांचीही मागणी आहे.

4. लडाखमध्ये स्थानिक लोकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीच्या हक्कांची मागणीही त्यांनी केली.

5. लडाखमध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणीही वांगचुक यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवनीत राणांचं पुरुषाबद्दल वादग्रस्त विधान!

Zodiac signs: आजचा दिवस ठरणार ‘सुपर लकी’! जाणून घ्या कोणत्या ४ राशींना मिळणार जबरदस्त साथ

IND vs SA 1st ODI : पराभवाचा वाचपा काढणार! IND vs SA पहिला वनडे कुठे पाहाल? प्लेईंग ११ कशी असेल, वाचा A टू Z माहिती

Panchagrahi Yog: 100 वर्षांनंतर बनणार पंचग्रही राजयोग; पाच ग्रह ३ राशींना देणार अफाट पैसा, किर्तीही होणार

Panhala Fort : महाराजांचा इतिहास जपणारा पन्हाळा किल्ला, थंडीच्या सुट्टीत करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT