Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले; वाचा तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price Today 3 June 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे.

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. त्यातच आता देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात (Maharashtra)पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ झाली आहे. गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 65 पैशांची घसरण झाली आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल (Diesel) 28 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त झालं आहे. तर छत्तीसगडमध्ये पेट्रोल 60 पैशांनी आणि डिझेल 59 पैशांनी महागलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 47 पैशांनी तर डिझेल 43 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल 25 पैशांनी महागले आहे. पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये इंधन महाग झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT