Gold Silver Price
Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : लग्नसराईत खरेदीदारांसाठी मोठा धक्का ! सोन्या-चांदीच्या भावात वाढ, तपासा आजचे दर

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : आठवडा सुरु झाल्यानंतर सलग तीन दिवस सोन्या-चांदीचे भाव हे स्थिर होते. परंतु, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कालच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा (Gold) प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,100 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 61,010 रुपये झाला आहे. तर चांदी 78,800 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल. (17th May 2023 Update )

सराफ व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, सोन्या-चांदीच्या किंमतीत (Price) सतत वाढ होत आहे. तर चांदीच्या भावात आज ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

काल सायंकाळपर्यंत चांदीचे भाव हे 78,500 होते तर आज सराफ बाजार सुरु झाल्यानंतर चांदी ही 78,800 रुपये प्रति किलोने विकली जाईल. त्यामुळे आज सोन्या-चांदीच्या दुकानात ग्राहकांचा कल हा कमी असेल.

1. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

2.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT