Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : सोन्याच्या दरात घसरण ! चांदीत किंचित वाढ, आषाढी एकादशीनिमित्त तपासा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate In Maharashtra : सराफ बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा घसरले आहे. पण चांदी मात्र दोन दिवसामध्ये महागली.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : सोन्याच्या दरात मागच्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळाली आहे. तर सराफ बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा घसरले आहे. पण चांदी मात्र दोन दिवसामध्ये महागली.

मागच्या दोन महिन्यांपूर्वी सोन्या-चांदीने नवीन रेकॉर्ड तयार केले. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर हा 65 हजारांचा आकडा क्रॉस करेल असे वाटत असताना. सध्या सोन्याचे भाव हे मंदावले आहेत. जाणून घ्या सोने-चांदीचे भाव किती कमी झाले ते.

1. सोन्याच्या दरात घसरण

गुड रिटन्सनुसार काल २८ जूनला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 54,500 रुपये (Money) मोजावे लागले तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,430 रुपये मोजावे लागले आहेत. तर आज २९ जूनला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,200 रुपये मोजावे लागले तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,110 रुपये मोजावे लागतील.

2. चांदीच्या दरात वाढ

गुड रिटन्सनुसार काल २८ जूनला 10 ग्रॅमसाठी ७१५ रुपये मोजावे लागले आहेत. तर आज २९ जूनला १० ग्रॅमसाठी ७१९ रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील दर

आज २४ कॅरेटसाठी मुंबईत (Mumbai) ५८,९६० रुपये, दिल्लीत ५९,११० तर पुण्यात ५८,९६० रुपये मोजावे लागणार आहे.

4. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT