Corona In India: गेल्या 24 तासात देशात 58 हजार 97 कोरोना रुग्णांची नोंद, तर 534 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

Corona In India: गेल्या 24 तासात देशात 58 हजार 97 कोरोना रुग्णांची नोंद, तर 534 जणांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मंगळवारी मोठी वाढ झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मंगळवारी मोठी वाढ झाली. एका दिवसामध्ये ५८ हजार ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांची संख्याही दिवसभरात वाढली आहे. मंगळवारी दीडशेपेक्षा कमी असणारी मृत्यूची संख्या अचानकच ५३४ वर येऊन पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासामध्ये १५ हजार ३८९ जण कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत.

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. देशामध्ये सध्या २ लाख १४ हजार ४ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासामध्ये १५ हजार ३९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशामध्ये ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची लसीकरण (Vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. यामध्ये आता १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण ३ जानेवारीला सुरु केले आहे. आतापर्यंत देशात १४७ कोटी ७२ लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. आज होणाऱ्या बैठकीमध्ये कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या संदर्भात माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.

पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसून येत आहे. पुण्यामध्ये मंगळवारी दिवसभरात तब्बल १ हजार १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क आहे. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात आजपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसले तर त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसले तर त्या व्यक्तीकडून थेट १ हजार रुपयांचा दंड घेतला जाणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT