New Terror Leader saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: नापाक इराद्यांचे नवे चेहरे, दहशतवादाचे तरुण चेहरे कोण? तरुणांना भडकवणार,दहशतवादी घडवणार?

Lashkar-e-Taiba: भारताच्या कारवाईनं आता लष्कर-ए- तैयबाचीही झोप उडवलीय. त्यामुळेच तैयबाच्या हाफिज सईदनं नव्या आकावर जबाबदारी सोपवलीय. तैयबात आता तरुणाची नवी दहशतवादी पिल्लावळ उभी राहतेय, ती कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

दहशतवादाला ना धर्म असतो ना चेहरा....मात्र पहेलगाम हल्ल्यानंतर पीओकेस्थित दहशतवादी संघटनांचा पोकळ आत्मविश्वास द्विगुणित झालायं...म्हणूनच की काय लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनेनं आपली सुत्र नव्या,ताज्या दमाच्या तरुणांच्या हाती सोपवलीएत....लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदवर मृत्यूची टांगती तलवार आहे. म्हणूनच संघटनेसाठी हाफिजनं सगळी सुत्र आपल्या मुलाक़डे म्हणजे तल्हा सईदकडे सोपवल्याची माहिती मिळतेय..

नापाक इराद्यांचे नवे चेहरे

हाफिजचा मुलगा तल्हा सईद तैयबाचा नवा आका

जकी-उर रहमान नवा लखवी ऑपरेशनल कमांडर

साजिद मीर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा प्रमुख

मोहम्मद याह्या मुजाहिद माध्यम प्रमुख

हाजी मोहम्मद अशरफ तैयबाचा नवा फंडिग हेड

आरिफ कासमानीला अल कायदासोबत समन्यवयाची जबाबदारी

जफर इक्बाल दहशतावाद्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी

आदिल ठोकर नवा मीड लेव्हल कमांडर

लष्कर-ए- तैयबात खांदेपालट झालीये. मात्र हाफिजच्या मुलगा तल्हा सईद सह अन्य साथिदार आधीही भारतविरोधी कारवायात गुंतलेले होते.

पीओकेस्थित दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान कायमच भारतात अशांतता पसरवत आलायं...सर्जिकल स्ट्राईक असो वा थेट एअर स्ट्राईक भारतानं दहशतवाद्यांचा बिमोड केलायं. मात्र आता भारतासमोर नापाक बाप-बेट्यांचं आव्हान असेल...साहजिकच दहशतवाद्यांच्या या नव्या पिल्लावळीचा लवकरच भारत खात्मा करेल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT