Lal Krishna Advani On Ram Mandir Saam Tv
देश विदेश

Ram Mandir: 'मी फक्त सारथी होतो', राम मंदिर उद्घाटनाआधी लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्या भावना

Lal Krishna Advani On Ram Mandir: भाजप नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर उद्घाटनाआधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Satish Kengar

Lal Krishna Advani On Ram Mandir:

भाजप नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर उद्घाटनाआधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राम मंदिराच्या उभारणीमुळे मी खुश असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर हे एक दिव्य स्वप्न असल्याचे म्हटले आहे.

डवाणी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. राजधर्म मासिकासाठी लिहिलेल्या लेखात लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, ते फक्त या चळवळीचे सारथी होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंदिर आंदोलनादरम्यान अडवाणींनी 1990 साली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. राम मंदिर आंदोलनात आघाडीवर असलेल्या अडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य अभिषेक कार्यक्रमापूर्वी त्यांची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अडवाणी यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, "आज रथयात्रेला 33 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी जेव्हा आम्ही रथयात्रेला सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, ज्या श्रद्धेने आम्ही प्रभू रामाच्या दिशेने या प्रवासाला सुरुवात करत आहोत, ते देशात एका चळवळीचे रूप घेईल.''

सूत्रांनी सांगितले की, हिंदी मासिका 'राष्ट्रधर्म'ची विशेष आवृत्ती 16 जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे. यामध्येच त्यांनी आपला लेख लिहिला आहे. लेखात अडवाणींनी संपूर्ण रथयात्रेदरम्यान विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत असल्याचे नमूद केले आहे. सूत्रानुसार अडवाणी म्हणाले, "तेव्हा ते फारसे प्रसिद्ध नव्हते. पण त्याचवेळी प्रभू रामाने आपल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आपला भक्त (मोदी) निवडला होता.''

अडवाणी म्हणाले, ''त्यावेळी मला वाटले की नियतीने ठरवले आहे की, एके दिवशी अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जाईल. ते नक्कीच बनवले जाईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

SCROLL FOR NEXT