Students and activists clashed with police in Leh, Ladakh, during protests demanding statehood and job reservations. Saam Tv
देश विदेश

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

Ladakh Protests Explained: गेल्या दोन दिवसापासून लडाख अशांत झालाय..मात्र लेह- लडाखमधील आंदोलक नेमके आक्रमक का झाले? त्यांच्या मागण्या काय आहेत? सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक चौकशीच्या फेऱ्यात का अडकणार आहेत?

Suprim Maskar

शांत आणि निवांत असलेले लडाख गेल्या काही दिवसांपासून अशांत झालय..दोन दिवसांपूर्वी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर उफाळलेल्या हिंसक आंदोलनात चारजणांना जीव गमवावा लागला..तर 59 जण जखमी झालेत. संतप्त जमावानं भाजप कार्यालयालाही आग लावली.

खरं तर लडाखमधली ही अशांतता २०१९ पासून सुरू झाली.. जेव्हा केंद्रसरकारनं लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी तेव्हापासूनच जोर धरू लागली होती. त्यातच आता सरकारी नोकरीत स्थानिकांना आरक्षण आणि लेह आणि कारगिल या दोन लोकसभा मतदारसंघांची निर्मिती करावी या मागण्यांसाठी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते ..मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित गेलं..

मात्र या हिसेंमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला..एवढंच नाही तर परदेशी फंडीगवरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या वांगचुक यांच्या संस्थेची चौकशी लावली. लडाखच्या हिंसक आंदोलन आता जरी शांत झालं असलं तरी ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये इतकचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना हमीभाव द्या; खासदार बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali Shopping In Thane: ठाण्यातील या 5 ठिकाणी करा दिवाळी शॉपिंग, स्वस्तात मस्त होईल खरेदी

Sambhajinagar Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या; पाच जणांना घेतले ताब्यात

Kolhapur: कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT