Manipur Kuki Militant attack  Saam TV
देश विदेश

Manipur News: मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांचा CRPF बटालियनवर हल्ला; घातपातात २ जवान शहीद

Kuki Militant attack: मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांनी थेट केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले आहेत.

Satish Daud

Manipur Kuki Militant attack

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नसून अजूनही कुकी आणि मेतेई या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्री कुकी अतिरेक्यांनी थेट केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केलं. यावेळी झालेल्या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद, तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शहीद झालेले दोन्ही जवान मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८व्या बटालियनचे होते. मणिपूर पोलिसांनी या हल्ल्याची माहिती दिली असून मध्यरात्री हा हल्ला झाल्याचे सांगितले आहे.

मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडलं. मतदान संपल्यानंतर काही तासांनी हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बाह्य मणिपूर सीटवर मतदान संपल्यानंतर काही तासांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या चौकीवर कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या नरनसेना गावात डोंगरी भागातून दरी भागाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यावेळी कुकी अतिरेक्यांनी बॉम्ब फेकला.

या स्फोटात पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना दोन जवानांना वीरमरण आलं. इतर जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT