Kolkata law college physical assault Saam tv news
देश विदेश

Kolkata: 'लग्न करत नाहीस ना...थांब'; कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; ३ आरोपींपैकी बड्या तरूण नेत्याचा समावेश

Kolkata Law College: कोलकात्यातील प्रसिद्ध लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार. तिघे आरोपी अटकेत. माजी विद्यार्थी व टीएमसी नेत्याचा सहभाग. पोलिसांकडून तपास सुरू, परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

कोलकात्यातील एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने धाडसाने पुढे येत कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, इतर दोनजण सध्या शिक्षण घेत आहेत. या प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू आहे.

पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. तिच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये सायंकाळच्या सुमारास ७:३० ते १०:५० च्या दरम्यान सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणार कारवाई करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पहिला आरोपी ३१ वर्षीय मनोजित मिश्रा आहे.

तो महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच, दक्षिण कोलकाता टीएमसीपी (तृणमूल छात्र परिषद) पक्षाचा सरचिटणीस आहे. त्याचे थेट तृणमूल काँग्रेसशी संबंध समोर आले आहेत. दुसरा आरोपी १९ वर्षीय झैब अहमद असून, तो पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर, प्रमित मुखर्जी (वय वर्ष २०) हा दुसरा आरोपी असल्याची माहिती आहे.

तक्रारीत पीडितेने म्हटलं की, आरोपीने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पीडितेने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. या गोष्टीचा त्याला राग आला. त्यानंतर त्यानं पीडितेवर अतिप्रसंग केला. पीडितेने विरोध केला. मात्र, तेव्हा तिला जखमी केलं. मारहाण करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिचा जबाबही नोंदवण्यात आला. पोलिसांनी साक्षीदारांचेही जबाब नोंदवले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून महाविद्यालयाचा भाग सील करण्यात आला. फॉरेन्सिककडून सध्या तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT