kolkata Durga Puja Pandal News  AI Image
देश विदेश

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Kolkata Devi Pandal Tragedy News : कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेप्रकरणी पूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी

  • १९ जणांचा मृत्यू आणि २५ जण जखमी

  • मंडपात मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना पाऊस सुरू

  • पूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना अटक

दुर्गापूजेचा उत्सव सुरू असतानाच कोलकात्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पूजा समितीच्या सचिव आणि उपाध्यक्षांसह सात जणांना अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंडपात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. गर्दीचे योग्य नियोजन नसल्याने भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मंडपात गर्दी वाढत असताना स्पिकरवरून असं सांगण्यात आलं की, मंडपाचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मंडपात असलेले भाविक घाबरले आणि बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. मात्र, ही घोषणा नेमकी कोणी केली आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात मंडपातील प्रवेशद्वार आणि येण्या-जाण्याचे मार्ग अरुंद असल्याचे समोर आले आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे. भाविकांना सुरक्षितपणे प्रवेश देणे, बाहेर पडण्याची व्यवस्था करणे आणि गर्दीला योग्य सूचना देणे याबाबत आवश्यक नियोजनाचा अभाव असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी गिरीश पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ११० आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असून, त्यापैकी सात जणांना अटक केली आहे. यामध्ये पूजा समितीचे पदाधिकारी, मंडपाच्या बांधकामाशी संबंधित व्यक्ती आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे दुर्घटनेची नेमकी कारणे शोधली जात आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

Children’s eye health: मुलांच्या डोळ्यांवर स्क्रीनचा वाढता ताण! पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं

SCROLL FOR NEXT