Kolkata 11 years old girl rape murder case crime news Saam Tv
देश विदेश

Shocking : भयंकर! ४ तरुणांनी रस्त्यात गाठलं, ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचलं, नंतर पोत्यात कोंबलं अन्...

Kolkata Crime News : कोलकात्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिला पोत्यात कोंबून जिवंतपणी तलावात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • कोलकात्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

  • अत्याचार करून पीडितेला पोत्यात कोंबून जिवंतपणी तलावात फेकलं

  • पीडितेच्या मृत्यूने गावात खळबळ

  • पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

कोलकात्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बारुईपूर परिसरात ११ वर्षीय मुलीला एका पोत्यात कोंबून जिवंतपणे तलावात फेकण्यात आले. यामध्ये पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी आता आरोपीला शिक्षा कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी घरातून बाहेर पडली होती. ती आपल्या मैत्रिणीसाठी वाढदिवसाचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. शोधमोहीम सुरू असतानाच रविवारी तिचा मृतदेह तलावात एका पोत्यात आढळून आला.

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मुलीच्या गुप्तांगांवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. याशिवाय शरीराच्या विविध भागांवर ओरखडे आणि चावल्याच्या खुणाही दिसून आल्या. तसेच तिच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला आहे. तपासादरम्यान फुफ्फुस आणि पोटात पाणी आढळल्याने मुलगी तलावात फेकली गेली तेव्हा ती जिवंत असल्याचे पोलिसांनी म्हटले.

दरम्यान, मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका व्यक्तीला मारहाण करून ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी मुख्य आरोपीला अटक केली. यासह आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मुलीसोबत चार जण जात असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देहू नगरीमध्ये न येता पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, भाविकांना आवाहन

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई; राज्यव्यापी रॅकेटचा पर्दाफाश, १३ आरोपी अटकेत

केतन हत्याकांडात हादरवणारा खुलासा, सिया-चेतनने आधीच केलं होतं लग्न; पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

Smartphone battery: या 7 कारणांमुळे तुमचा फोन होतोय अचानक स्लो

Ladki Bahin Yojana: ₹१५०० की ३००० रूपये, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार? जून-जुलै हप्त्याची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT