King Cobra Video  Saam TV
देश विदेश

King Cobra Video : कोब्रासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; शेपटी धरताच घडलं असं काही...

हा व्हिडीओ कर्नाटकातील सांगितला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

King Cobra Video : साप असं जरी नावही ऐकलं तर बहुतेकांना घाम फुटतो. पण असे काही लोकही आहेत, ज्यांना साप (Snake) म्हणजे एखादं खेळणंच वाटतं. काही लोकं सापासोबत मस्ती करताना, त्यांच्याशी जीवघेणे खेळ खेळताना दिसतात. मात्र हा खेळ अनेकदा त्यांच्या अंगलटही येतो. आजवर असे अनेक व्हिडीओ (Viral Video) तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मस्ती करणाऱ्या एका तरुणाला सापाने चांगलाच धडा शिकवला आहे. (king cobra Viral video india)

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला हा व्हिडीओ कर्नाटकातील सांगितला जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता कोब्राबरोबर स्टंट करत आहे. या तिन्ही सापांना तो वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करतोय. यातील एका सापाने या तरुणाला अशा ठिकाणी चावा घेतला, ज्यामुळे या तरुणाची बोलतीच बंद झाली. आपल्यासोबत असं काही होईल याचा स्वप्नातही या तरुणाने विचार केला नसेल

१९ सेकंदाच्या हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वविटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, तीन खतरनाक कोब्रा साप एकत्र दिसत आहे. या सापांसोबत एक तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. (King Cobra Video National Geographic)

हा तरुण सापाची शेपटी हातात धरून आपले करतब दाखवतो आहे. त्याचवेळी एक साप या तरुणावर अचानक हल्ला करतो. सापाने अचानक हल्ला केल्याने या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकते. कशीबशी तो सापाच्या तावडीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सापाने त्याच्या पायाला चावा घेतो.

दरम्यान, साप चावल्यानंतर या तरुणाला कर्नाटकातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये स्टंटची क्रेज वाढलेली दिसले. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करतात. मात्र, वन्यप्राण्यांसोबत स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच तुमचा जीव धोक्यात येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचे स्टंट करू नका.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT