Terrible Accident  Saam tv
देश विदेश

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

कारचा जागेवरच चक्काचूर

साम टीव्ही ब्युरो

खरगोन: भीषण अपघातात (terrible accident) एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खरगोनमध्ये (Khargone) शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर- मनमाड मार्गावरील गुहा चिचोलीजवळ हा भीषण अपघात (accident) झाला आहे. तरे कुटुंबातील ३ जण कारने पुण्याला (Pune) जात होते. यादरम्यान बसची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे कारचा जागेवरच चक्काचूर झाला. कारमधील तरे कुटुंबातील (family) ३ जण आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार खरगोनच्या सौमित्र नगरमध्ये राहणाऱ्या तारा कुटुंबातील लोक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या गाडीतून पुण्याला जात होते. तरे कुटुंबातील आई रंजना, मुलगा विपुल , सून प्रतीक्षा, नातू हे गाडीत होते. कार चालकाचे नाव जगदीश राठोड असे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील अहमद नगर- मनमाड मार्गावरील गुहा चिचोलीजवळ एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलगा विपुलची प्रकृती चिंताजनक आहे.

मुलगा विपुल आणि प्रतीक्षा पुण्यात काम करतात. प्रतीक्षाचा ७ महिन्यांचा मुलगा लुनय याच्यासोबत ती मॅटर्निटी लाईव्हवर होती. काल परत पुण्याला जाऊन जॉईन करायचं होतं. मात्र, या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याअगोदर वडील दीपक तरे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. डॉक्टर असल्याने ते लोकांवर मोफत उपचार करायचे. विपुलचा मोठा भाऊ वैभव तरे हा देखील होमिओपॅथी डॉक्टर आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT