mahakumbhmela fire Saam Tv News
देश विदेश

Mahakumbh cylinder blast: महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी

Khalistan Zindabad Force: महाकुंभमेळ्यात झालेल्या सिलिंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. ई-मेल पाठवत खलिस्तान जिंदाबाद फोर्सनं महाकुंभमेळ्यात घडलेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलीय.

Bhagyashree Kamble

महाकुंभमेळ्यात झालेल्या सिलिंडर स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. दहशतवादी संघटनेनं याबाबात काही माध्यम संस्थांना ई- मेल पाठवला आहे. ज्यामध्ये पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचं त्यात म्हटलं आहे. हा स्फोट म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेला इशाराच आहे, ही तर सुरूवात आहे, असं त्या ई- मेलमध्ये म्हटलंय.

प्रयागराज येथे महाकुंभमेळा आहे. या ठिकाणी लाखो भाविक येतात. नियमित हजारो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होतात. रविवारी महाकुंभ मेळ्यामध्ये आग लागली होती. सेक्टर १९ - २०मध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये स्वयंपाक करताना आग लागल्याची माहिती आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका पाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग पसरत गेली आणि आगीनं विक्राळ रूप धारण केलं होतं. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आता या आगीबाबत दहशतवादी संघटना खलिस्तान जिंदाबाद फोर्सनं मोठा दावा केला आहे. त्यांनी कॅनडा आणि पंजाबच्या मीडियाला एक ई - मेल पाठवला आहे. ज्यात त्यांनी प्रयागराजमध्ये लागलेल्या आगीची जबाबदारी घेतली आहे. ई - मेलमध्ये संघटनेनं सांगितले की, त्यांचा हेतू कुणाला हानी पोहोचवणे नसून, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी एक अलर्ट आहे.

ही तर फक्त सुरूवात आहे. अशा आशयाचं ई-मेल पाठवण्यात आलं आहे. ई-मेलमध्ये फतेह सिंह बागी यांचं देखील नाव लिहिलेलं आहे. दरम्यान हा स्फोट पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचं दहशतवादी संघटनेनं म्हटलं आहे.

युपी पोलीस काय म्हणाले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत विशेष डीजीपी म्हणाले, ही घटना उत्तर प्रदेशची आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे. यावर बोलणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT