Padmini Thomas To Quit Bjp? Kerala Bjp Faces Two Major Setbacks saam tv
देश विदेश

दोन दिवसांत दोन धक्के! माजी आंतरराष्ट्रीय धावपटूचा भाजपला रामराम, प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला राजीनामा

Padmini Thomas to Resign from BJP: केरळ भाजपला आणखी एक धक्का बसलाय. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू पद्मिनी थॉमस यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी केलीय. पद्मजा वेणुगोपाल यांच्यानंतर त्या पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

Bharat Jadhav

  • गेल्या दोन दिवसांत केरळ भाजपला सलग दोन राजकीय धक्के

  • माजी आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मिनी थॉमस भाजप सोडण्याच्या तयारीत

  • भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या दोन दिवसात केरळ भाजपला एका पाठोपाठ दोन धक्के बसलेत. पद्मजा वेणूगोपाल पाठोपाठ माजी आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मिनी थॉमस हेही पक्ष सोडण्याची तयारीत आहेत. भाजपनं दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत थॉमस यांनी पुन्हा ‘काँग्रेस’मध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

पद्मिनी थॉमस या सध्या केरळ भाजपच्या राज्य अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत होत्या. आपला राजीनामा त्या आज शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. काँग्रेस हा आपला ‘परिवार’ असल्याचे सांगत आपण पुन्हा स्वगृही परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थॉमस यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी आजच माझा राजीनामा देणार आहे. क्रीडा किंवा राजकारणाच्या माध्यमातून काहीतरी भरीव काम करता येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत मला या दोन्ही क्षेत्रांत काहीच करता आले नाहीये.

कोणत्याही विशिष्ट अटीवर आपण भाजपमध्ये गेलो नव्हतो, परंतु पक्षात आल्यानंतर नेतृत्वाने अनेक आश्वासने दिली होती, असा दावा थॉमस यांनी केला. “पक्षाने मला विधानसभा निवडणुकीचे तिकीट किंवा क्रीडा क्षेत्रात एखादे महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन दिले होतं; परंतु यापैकी काहीच प्रत्यक्षात उतरले नाही. सध्याच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदावर काम करण्यास कोणताही वाव नव्हता,” अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये परतण्याची घोषणा केल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर पद्मिनी थॉमस यांनीही हाच मार्ग स्वीकारल्याने केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

Vastu Tips : घरातील 'या' पाच ठिकाणी रिकामी भांडी ठेवू नका, नाहीतर येईल नशिबी येईल दारिद्र्य

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT