OnePlus 11 Flipkart scam Saam Tv
देश विदेश

Flipkart वरून नवीन OnePlus 11 ची दिली ऑर्डर, मात्र डिलिव्हरीत आला जुना फोन...

OnePlus 11 Flipkart scam: Flipkart वरून नवीन OnePlus 11 ची दिली ऑर्डर, मात्र डिलिव्हरीत आला जुना फोन...

Satish Kengar

OnePlus 11 Flipkart scam: 

ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीची प्रकार वाढत आहे. अलीकडेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात एका युजरने ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून OnePlus 11 ऑर्डर केला होता. परंतु त्याला जुना वापरलेला फोन डिलिव्हरीत मिळाला. केरळमधील कोची येथील रहिवासी एमके सतीश यांचा आरोप आहे की, त्यांना नवीन फोनऐवजी जुना वापरलेला स्मार्टफोन डिलिव्हरी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सतीशने OnePlus 11 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने फ्लिपकार्टवरून फोन ऑर्डर केला. डिलिव्हरी चार्जेससह फोनची किंमत 53,098 रुपये होती.

सतीशने फ्लिपकार्टवर 'टर्स्ट' नावाच्या विक्रेत्याकडून हा फोन खरेदी केला. विशेष म्हणजे या विक्रेत्याकडे 'फ्लिपकार्ट अॅश्युअर्ड बॅज' होता, जो ई-कॉमर्स कंपनीने विश्वासू व्यापाऱ्यांना दिलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. (Latest Marathi News)

पॅकेज मिळाल्यावर सतीशने काळजीपूर्वक फोन तपासला. डिलिव्हरी कर्मचार्‍यांनी पॅकेज त्याच्यासमोर अनबॉक्स केलं होतं. सर्वकाही ठीक असल्याची खात्री करून. फोन काम करत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या उत्साहाचं निराशेत रूपांतर झालं. सुरुवातीला त्यांना असे वाटले की, कमी बॅटरीमुळे फोन सुरु होत नसावा, मात्र तसं नव्हतं.

सुरुवातीला त्यांना असे वाटले की, कमी बॅटरीमुळे फोन सुरु होत नसावा, मात्र तसं नव्हतं. दरम्यान, कधीही ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर, ऑर्डर प्राप्त झाल्यास ती अनबॉक्स करताना त्याचा व्हिडीओ नक्की बनवा. जेणेकरून तुमच्यासोबत फसवणूक झाल्यास याची तक्रार करताना तुम्हाला तो पुरावा म्हणून वापरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT