ED's Allegations of Hawala Transactions: saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; FIR दाखल करण्याचे कोर्टाने दिले आदेश

Anti-Corruption Law Against Pinarayi Vijayan And Family: केरळ हायकोर्टाने माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीणा आणि जावई मोहम्मद रियास यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Omkar Sonawane

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते पिनाराई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केरळ हायकोर्टाने पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीना आणि जावई मोहम्मद रियास यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनायाने कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांशी संबंधित पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने याआधी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल के. जाजू बाबू आणि अ‍ॅडव्होकेट व्ही. सेतुनाथ, तसेच EDच्या वतीने उपस्थित असलेले जयशंकर व्ही. नायर यांचे युक्तिवाद ऐकले होते. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 अंतर्गत ED कडून माहिती मिळाल्यानंतर राज्य पोलिसांना प्राथमिक चौकशी न करता FIR दाखल करणे बंधनकारक आहे का, हा महत्वाचा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झाला होता. ED आणि याचिकाकर्त्यांनी या प्रकरणातील परिस्थिती पाहता प्राथमिक चौकशी आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. राज्य पोलिसांनी तातडीने FIR दाखल करायला हवी होती, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT वरही प्रश्न उपस्थित केले. दक्षता विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश नसताना SIT स्थापन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयाशिवाय अशी कार्यवाही करता येत नसल्याचेही याचिकाकर्त्यांनी नमूद केले.

EDने केरळच्या DGP ना पत्र लिहून केली होती FIRची मागणी

19 ऑगस्ट रोजी EDने प्रसिद्धिपत्रक जारी करून या प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांशी संबंधित पुरावे गोळा केल्याचे सांगितले होते. संबंधित आरोपींनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे केल्याचा आरोपही EDने केला होता. यानंतर 7 सप्टेंबर रोजी EDने केरळचे पोलीस महासंचालक (DGP) यांना पत्र पाठवले.

या पत्रात पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीणा आणि मोहम्मद रियास यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, राज्याच्या गृहसचिवांनी DGP ना हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्याचे निर्देश दिले. तसेच प्राथमिक चौकशीसाठी SIT स्थापन करण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Juice For Blood Sugar: हे 5 ज्यूस प्या, ब्लड शुगर ना कमी होणार ना जास्त

Maharashtra News Live Update: कल्याण न्यायालयातील लिफ्ट बंद पडली; दोन वरिष्ठ वकील तासभर अडकले

LPG Gas Update : बंद पडलेले गॅस कनेक्शन पुन्हा कसं सुरू करायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Salad Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज जेवताना खा सॅलड, मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?

SCROLL FOR NEXT