Kerala New Name  Saam tv
देश विदेश

Kerala New Name : केरळचे नाव बदलणार; विधानसभेत प्रस्ताव पारित, केंद्र सरकार काय निर्णय घेणार?

Kerala New Name Update : केरळ विधानसभेत दुसऱ्यांदा हा राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. केरळ विधानसभेत दुसऱ्यांदा प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवला आहे.

Vishal Gangurde

केरळ : केरळचे नाव बदलण्यासाठी केरळमधील विधानसभेत 'केरळम' नाव करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सोमवारी दुसऱ्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्राने जुना प्रस्ताव माघारी पाठवला होता. त्यावेळी सुधारणा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता केरळ विधानसभेत प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवला आहे.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावातून राज्याचा नाव बदलण्याचा विषय मांडण्यात आला. संविधानच्या कलम ३ अंतर्गत केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. सुरुवातीच्या प्रस्तावावेळी आययूएमएलचे आमदार एन शमसुद्दीन यांनी सुधारणा करून अधिक स्पष्टता आणण्याची मागणी केली होती.

मागील वर्षी ९ ऑगस्ट रोजी राज्याचं नाव बदण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी केरळचे नाव हे 'केरळम' करण्याचा प्रस्ताव मांडला होता. घटनेच्या अनुसूचीनुसार 'केरळम' करण्याचा प्रस्ताव केंद्रापुढे सादर केला होता.

नाव बदलण्याच्या प्रस्तावाविषयी मुख्यमंत्री पिनाराई म्हणाले, मळ्याळम भाषेत 'केरळम' नावाचा वापर करणे सामान्य बाब आहे. रेकॉर्डला'केरळ' नाव आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव सादर करण्यात आला. केरळचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर आहे. मळ्याळम भाषिक लोकांना एकसंघ करण्यासाठी तसेच राज्याला एकिकृत करणे गरजेचं आहे. संविधानाच्या पहिल्या अनुसूचित आमच्या राज्याचं नाव हे केरळ लिहिलं आहे'.

दरम्यान, मागील वर्षी ९ ऑगस्ट रोजी सर्वांच्या अनुमतीनंतर केरळ राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. मात्र, या प्रस्तावात केंद्रीय गृहमंत्रालयाने तांत्रिक त्रृटी काढून सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'आधीच्या प्रस्तावात सुधारणा करण्याची गरज होती. आता नव्या प्रस्तावाला एलडीएफ , काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात हा प्रस्ताव स्वीकारला आहे'. या आधीच्या प्रस्तावात यूडीएफ आमदार एन शम्सद्दीन यांनी सुधारणा करण्याची सल्ला दिला होता. त्यानंतर आधीचा प्रस्ताव केंद्राने सुधारण्यासाठी माघारी पाठवला. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमसीर यांनी सर्वांच्या अनुमतीने प्रस्ताव पारित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भांडुप पश्चिम येथे स्टेशन प्लाझा इमारतीचा भाग कोसळला

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद

Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय का बदलला?

वाजवा रे ढोल-ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

SCROLL FOR NEXT