kenya Road Accident: केनियात भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना चिरडल्याची भयकंर घटना घडली आहे. या भरधाव ट्रकने पादचारी आणि वाहनांना चिरडलं. या अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताने संपूर्ण केनिया हादरलं आहे. (Latest Marathi News)
एका वृत्तानुसार, केनियाच्या पश्चिम भागातील लोंडियानी जंक्शन येथे सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या या भीषण अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. वाहनाखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू आहे.
स्थानिक पोलीस कमांडर जेफ्री मायेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे . एक किंवा दोन जण आणखी ट्रकखाली दबल्याची शक्यता आहे. या अपघातात ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना विविध रुग्णालयात हलविण्यात येत आहे'. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलीस कमांडर टॉम मोबोया ओडेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरिचोच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर या भरधाव ट्रकने पादचाऱ्यासहित आठ वाहनांना चिरडलं. यामध्ये रस्त्याशेजारील विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांचीही मृत्यू झाला आहे.
राष्ट्रपती व्हिलियम रुटोसहित केनियातील अनेक नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. केनियाचे परिवहन मंत्री किपचुम्बा मुर्कोमेन ट्विट करत म्हणाले की, या भीषण अपघाताचं नेमकं कारण काय आहे, यासाठी चौकशी करण्यात येईल. तसेच शवगृहात अद्याप ४५ मृतदेह आहे. तर अन्य जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रक खूप वेगात होता. मी एवढंच सांगू शकतो की, मी खूप भाग्यवान आहे की, मी जीवंत आहे . मी खूप भयानक दृश्य पाहिलं. अपघातानंतर मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. या अपघातात अनेक जणांनी प्राण गमावले आहेत'.
तर दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगतिले की, हा अपघात अचानक झाला. भरधाव ट्रेक समोरून येताना लोकांना बाजूला व्हायला वेळच मिळाला नाही. अपघातानंतर अनेक जण ओरडत होते. अपघातानंतर लोकांची एकच धावाधाव झाली'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.