Speeding car hits Kedar Kashyap’s convoy, five people seriously injured saam tv
देश विदेश

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

Chhattisgarh Forest Minister Kedar Kashyap convoy accident in Kondagaon: छत्तीसगडचे वनमंत्री केदार कश्यप यांच्या ताफ्याचा कोंडागावमध्ये भीषण अपघात होता होता टळला. एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर झाला असून, पीए आणि पोलिस जवानांसह 5 जण गंभीर जखमी झाले.

Omkar Sonawane

छत्तीसगडमधील कोंडागाव येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे वनमंत्री केदार कश्यप यांच्या ताफ्याचा भीषण अपघात होता होता टळला. सुदैवाने या अपघातात मंत्री केदार कश्यप थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या ताफ्यातील वाहनाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात मंत्र्यांचे पीए आणि पोलिस जवानांसह एकूण 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनमंत्री केदार कश्यप यांचा ताफा फरसागुडा येथून कोंडागावच्या दिशेने परतत होता. ताफा जुनवानी परिसरात पोहोचला असता समोरून आलेल्या भरधाव कारने पहिले मंत्र्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर ही कार ताफ्यात मागून येत असलेल्या फॉलो वाहनावर जाऊन आदळली.

धडक इतकी जोरदार होती की, वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि वाहनाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने कोंडागाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मंत्री केदार कश्यप यांचे पीए अनुराग शर्मा यांच्या छातीत तीव्र वेदना होत आहेत. तर ड्रायव्हर सुनील कुमार मौर्य यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

प्राथमिक उपचारानंतर अनुराग शर्मा आणि सुनील कुमार मौर्य या दोघांना पुढील उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षारक्षक राजेश नेताम यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर पोलीस यंत्रणेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. धडक देणाऱ्या कारच्या चालकाची चौकशी करण्यात येत असून, अपघात नेमका कसा झाला याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT