Karnataka Election Result Saamtv
देश विदेश

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये JDS पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत? कॉंग्रेस,भाजपकडून संपर्क सुरू

Karnataka Election Result Live Updates: अंतिम निकालापर्यंत कदाचित त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gangappa Pujari

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला पहिल्या कलामध्ये बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु अंतिम निकालापर्यंत कदाचित त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच जेडीएस पुन्हा एकदा किंगमेकरची भूमिका पार पाडणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत...

कर्नाटक विधानसभा निवडणूकांचे (Karnataka Election Result) निकाल हाती येत आहेत. ज्यामध्ये JDS पुन्हा एकदा किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवत आहेत. याआधी तिसऱ्या क्रमांकावर येऊन जेडीएसने यापूर्वी तीनदा सरकार स्थापन केले आहे. आता चौथ्यांदा जनता दल सेक्युलर सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. (Latest Marathi News)

जेडीएस हा कर्नाटकमधील एक प्रादेशिक पक्ष आहे. जेडीएस प्रमुख एच डी कुमारस्वामी कर्नाटकातील चन्नापट्टन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सीपी योगेश्वर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने गंगाधर एस. यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

२०१८ मध्येही आले होते सत्तेत...

या आधी 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 80 जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसने जेडीएससोबत आघाडी करुन सरकार स्थापन केलं होते. मात्र त्यानंतर भाजपने फोडाफोडी करत पुन्हा सत्ता स्थापन केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT