Car Accident
Car Accident Saam TV
देश विदेश

Car Accident : मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

साम टिव्ही ब्युरो

Karnataka: कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकच्या विजयपूरा येथे काल (गुरुवारी) रात्री एक मोठी दुर्घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारचा प्रवासात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये साध्वी निरंजन ज्योती आणि कार चालक दोघेही सुदैवाने बचाले आहेत. मात्र कारचालक यात जखमी असून साध्वी निरंजन ज्योती या देखील किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विजयपुरा नॅशनल हायवे - ५० येथे काल रात्री हा अपघात झाला. साध्वी निरंजन ज्योती या आपल्या इनोव्हा या कारमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी हायवेवर लोखंडी सळ्या असलेला एक ट्रक तेथे आला आणि कारला मागून जोरात धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये ट्रक जागेवरच पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी (१६ मार्च) भाजप मार्फत कर्नाटकमध्ये महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी साध्वी निरंजन ज्योती येथे येत होत्या. त्यावेळी रस्त्यातच ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे. ट्रक चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने हा अपघात झाला असं पोलिसांनी म्हटलं आहे.

कोण आहेत साध्वी निरंजन ज्योती ?

साध्वी निरंजन ज्योती या उत्तर प्रदेशच्या फतेहपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. आपल्या वक्तव्यांनी त्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. पहिल्याच प्रयत्नात त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. फूड प्रोसेसिंग राज्य मंत्रीपद साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे आहे.

साल १९६७मध्ये निरंजन ज्योती यांचा जन्म झाला. इयत्ता १२ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आहे. तसेच वयाच्या २१ व्या वर्षी स्वामी अच्युतानंद यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन त्यांनी संन्यास घेतला होता. तसेच विश्व हिंदू परिषदेत केंद्रीय सहमंत्री म्हणून त्यांनी याआधी काम पाहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT