Karnataka Accident Saam tv
देश विदेश

Karnataka Accident: कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात, १२ जण जागीच ठार

Karnataka Police: कर्नाटकातील (Karnataka) चिकबल्लापूर (Chikkaballapur) येथे ही घटना घडली आहे.

Priya More

Karnataka News:

कर्नाटकामध्ये भीषण अपघाताची (Karnataka Accident) घटना समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील (Karnataka) चिकबल्लापूर (Chikkaballapur) येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचा तपास कर्नाटका पोलिसांकडून सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हा अपघात झाला आहे. भरधाव कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही कार बागेपल्लीवरून चिक्कबल्लापूरला जात होती. ही घटना गुरुवारी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास घडली.

अपघाताची माहिती मिळताच बागेपल्ली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या १२ ही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.

या अपघाताचे नेमकं कारण समोर आलं नाही. याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पण दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कार आणि ट्रकला रस्त्याच्या बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली. दरम्यान, कर्नाटकामध्ये मंगळवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला देखील भीषण अपघाताची घटना घडली होती. भरधाव ट्रेनने दोन भावांसह ३ दिव्यांग मुलांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Died: अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची हत्या; घरात शिरून संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही : फडणवीस

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT