कर्नाटक: कर्नाटकचे (Karnataka) अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुलगा निखिल आणि मुलगी स्नेहा असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कट्टी यांना रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या डॉलर्स कॉलनी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एमएस रमैया रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे देखील पाहा -
उमेश विश्वनाथ कट्टी हे सध्या बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते कर्नाटक विधानसभेवर 8 वेळा निवडून आले होते. बोम्मई सरकारमध्ये ते अन्न-पुरवठा आणि वनमंत्री म्हणून कार्यरत होते. कर्नाटकचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असे दोन भाग व्हावेत, असे त्यांचे स्वप्न होते. ते उत्तर कर्नाटक वेगळे राज्य करण्याच्या बाजूने होते.
1985 मध्ये वडील विश्वनाथ कट्टी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कट्टी जनता पार्टी, जनता दल, जेडी(यू) आणि जेडी(एस) सोबत होते. त्यांनी यापूर्वी जे.एच.पटेल, बीएस येडियुरप्पा, डी.व्ही सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी शोक व्यक्त केला
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'माझे जवळचे सहकारी वनमंत्री उमेश कट्टी यांच्या अकाली निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने कर्नाटकने एक कार्यक्षम आणि सक्रिय नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.