Karnataka High Court saam tv
देश विदेश

karnataka high court : हुंड्याच्या प्रकरणात पतीच्या नातेवाईकांनाही पुराव्याशिवाय गुंतवलं जातं - हायकोर्ट

karnataka high court on domestic case : कर्नाटक हायकोर्टाने हुंडा प्रतिबंध कायद्याच्या गैरवापराविषयी चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने एका प्रकरणावरील सुनावणी दरम्यान महिलेकडून तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना हुंडा प्रतिबंध कायद्यात अडकवलं जातं, असं वक्तव्य केलं आहे. म

Vishal Gangurde

karnataka latest News :

कर्नाटक हायकोर्टाने हुंडा प्रतिबंध कायद्याच्या गैरवापराविषयी चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने एका प्रकरणावरील सुनावणी दरम्यान महिलेकडून तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना हुंडा प्रतिबंध कायद्यात अडकवलं जातं, असं वक्तव्य केलं आहे. महिलेकडे कोणतेही पुरावे नसतात. काही प्रकरणात -४९८ ए कलमाचा काही ठिकाणी चुकीचा वापर होत असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

किरकोळ वाद कोर्टात

कोर्टात सध्या नवरा आणि बायकोमधील किरकोळ वाद देखील कोर्टात पोहोचू लागले आहेत. या प्रकरणात पतीच्या नातेवाईकांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो. पतीच्या नातेवाईकांच्या विरोधात कोणताही पुरावा नसतानाही त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जातो. नवरा आणि बायकोमध्ये अनेक कारणांवरून भांडणे होतात.

किरकोळ वादाला चुकीचं वळण

दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर महिलेकडून अचानक या प्रकरणाला कलम ४९८ ए या गुन्ह्याचं वळण दिलं जातं, असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं. दरम्यान, कर्नाटक कोर्टाने एका प्रकरणात पतीच्या आठ नातेवाईकांविरोधातील ४९८ ए कलमान्वये दाखल केलेला गुन्ह्याचं प्रकरण रद्द केलं.

'जोडप्यासोबत नातेवाईक राहत नसताना आरोप का?'

या प्रकरणात महिलेने पतीच्या आठ नातेवाईकांविरोधात हुंड्याचा आरोप लगावला. तसेच महिलेने पती आणि सासूविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात कोर्टाने म्हटलं की, 'महिलेचा पती आणि सासूविरोधात आरोप आहे. महिलेने आरोप केलेले नातेवाईक त्यांच्या शहरातही राहत नाही. त्यांच्याविरोधात विशेष कोणताही आरोप देखील नाही. अशा वेळी आठ नातेवाईकांच्या विरोधात हुंड्याचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही. पण पती आणि सासू विरोधात खटला सुरु राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT