Karnataka Crime News Saam Tv
देश विदेश

Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याचा राग, बापाकडून गर्भवती मुलीची हत्या; नवरा अन् सासू-सासऱ्यांनाही सोडलं नाही

Karnataka Crime News : कर्नाटकातील हुबळी तालुक्यात प्रेमविवाह केल्यामुळे एका गर्भवती तरुणीची तिच्याच वडिलांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. सासरच्या मंडळींवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • कर्नाटकातील हुबळी तालुक्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना

  • प्रेमविवाह केल्याने गर्भवती तरुणीची हत्या

  • सासरच्या मंडळींवर तलवारीने हल्ला; काही जण जखमी

  • आरोपी वडील अटकेत

कर्नाटकातून धक्कादायक घटना घडली आहे. निर्दयी बापाने आपल्या गर्भवती मुलीची तिच्याच सासरी जाऊन हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे हा प्रकार घडला. या दुर्घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृत मुलीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर तलवारीने वार केला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हुबळी तालुक्यातील इनापूर गावात घडली आहे. सात महिन्यांपूर्वी मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांचा प्रेमविवाह झाला होता. विवेकानंद दोड्डामणी हे दलित समाजाचे होते, त्यामुळे मान्या पाटील यांच्या कुटुंबाने या लग्नाला तीव्र विरोध केला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोडही केली. नोंदणीकृत लग्नानंतर मान्या आणि विवेकानंद हावेरी जिल्ह्यात राहत होते, त्यांना घरी परत येण्याची भीती वाटत होती.

तरीही मान्या आणि विवेकानंद ८ डिसेंबर रोजी गावी परतले. लग्नानंतर मान्या सहा महिन्यांची गर्भवती होती. मान्या गावात आल्याचे कळताच, पाटील कुटुंबाने तिची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी संध्याकाळी त्यांनी विवेकानंदांचे वडील सुभाष दोड्डामणी यांना ट्रॅक्टरने मारून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी विवेकानंदांना सांगितले की त्यांच्या वडिलांचा अपघात झाला आहे. हे ऐकून विवेकानंद घरातून निघून गेले. मान्या तिच्या सासू रेणवासोबत घरी होती.

घरात दोघे एकटे असताना पाटील कुटुंबाने त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने मान्याचा मृत्यू झाला आणि तिच्या सासूला गंभीर दुखापत झाली. सात महिन्यांनंतर, मान्याचे वडील प्रकाश गौडा पाटील, नातेवाईक वीरंगौडा पाटील आणि भाऊ अरुण गौडा, यांनी तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर पाठोपाठ, आता कुंभासाठी बोगस भरतीचा प्रकार उघड

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

SCROLL FOR NEXT