कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षात नाराजी उफाळून आली आहे. जंगली हत्तींना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. वन विभागाच्या मोहिमेला विरोध करत या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मलनाड परिसरात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीही चव्हाट्यावर आली आहे. चिकमगळूर, हासन आणि मलनाड परिसरातील जंगली हत्तींच्या स्थलांतराचा मुद्दा सध्या वादाचा विषय ठरला आहे. हासन जिल्ह्यातील बेलूर परिसरातून जंगली हत्तींना चिकमगळूर जिल्ह्यातील भद्रा वन्यजीव अभयारण्याच्या दिशेने हलवण्याची मोहीम वन विभागाकडून राबवली जात आहे. या मोहिमेला स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.
या प्रकरणी राजीनाम्याचा इशारा देणाऱ्या आमदारांमध्ये मुडीगेरेच्या आमदार नयना मोटम्मा, श्रृंगेरीचे आमदार टी.डी. राजेगौडा आणि चिकमगळूरचे आमदार एच.डी. थम्मय्या यांचा समावेश आहे. हे तिन्ही आमदार काँग्रेसचे आहेत. वन विभागाने 25 नोव्हेंबरपासून हतींच्या स्थलांतरीची कोणतीही मोहीम राबवली जाणार नसल्याचे आमदारांना आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन देऊनही मुडीगेरे परिसरात स्थलांतराची मोहीम सुरू असल्याने आमदार संतप्त जजले आहेत.
गोनिबीडू होबळीअंतर्गत येणाऱ्या 20 हून अधिक गावांमध्ये हत्तींच्या हल्ल्यांची भीती व्यक्त केली जात आहे. हत्तींच्या स्थलांतरामुळे स्थानिक नागरिकांच्या जीविताला आणि शेतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.