कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमधील सत्तासंघर्ष सर्वांसमोर आलाय. मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. कर्नाटकात काँग्रेसनं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची वाटणी केली होती. आता सिद्धरामय्या यांच्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये सिद्धरामय्यांच्या कार्यकाळाची अडीच वर्षे पूर्ण होतील. अडीच वर्ष झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार आहे. त्यांच्या नंतर डी.के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. मात्र काँग्रेस पक्षातील काही नेते यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवासांपासून
डीके शिवकुमार यांचे समर्थक नेतृत्व बदलण्याची मागणी करत आहेत. सिद्धरामय्या यांच्या जागी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी होतेय. परंतु काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊ आलेले रणदीप सुरजेवाला यांनी शिवकुमार यांच्या समर्थकांची मागणी फेटाळून लावलीय.
'अनेक आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केलीय. यावर रणदीप सुरजेवाला म्हणाले, मी माझ्या आमदारांना सल्ला देतो की जर त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी माध्यमांमध्ये मुद्दा उपस्थित करण्याऐवजी पक्षाच्या व्यासपीठावर बोलावे. जर पक्ष संघटनेमध्ये काही समस्या असतील तर मुख्यमंत्र्यांशी बोलावे. राज्याचे मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे, अशी चर्चा असेल तर तसं काही असं सुरजेवाला म्हणालेत. यामुळे शिवकुमार मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी अखेरचा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १०० आमदारांशी संपर्क केलाय.
हा फॉर्म्युला काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल आणि कर्नाटकमधील प्रभारी महासचिव रणदीप सुरजेवाला यांच्यातील बैठकीत ठरला होता. ही बैठक के.सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती. दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षामुळे रणदीप सुरजेवाला कर्नाटकमध्येच ठाण मांडून बसलेत. ते एकेका आमदार व जिल्हाध्यक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा करताहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ही सरकारच्या कार्यप्रदर्शनाची तपासणी आहे. यामध्ये नागरिकांच्या अपेक्षा, घोषणा पत्रातील वचने आणि सरकारची जबाबदारी यांचा आढावा घेतला जातोय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीचा हेतू सत्ता परिवर्तन असून शकतो. या प्रक्रियेत सर्वांची मते जाणून घेतली जात आहेत. सिद्धरामय्यांच्या मुख्यमंत्री काळाचाही यात आढावा घेतला जाणार आहे. रणदीप सुरजेवाला हा आढावा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर सादर करतील. त्यानंतरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बदलाच्या प्रश्नावर उत्तर देताना “हा निर्णय हायकमांड घेईल” असं म्हटलंय. त्यामुळे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार ह्याचा गट सत्ता स्थापनेसाठी चाचपणी करताहेत. सिद्धरामय्या मार्च-एप्रिल २०२६ मधील आगामी अर्थसंकल्पापर्यंत मुख्यमंत्रीपदी राहू इच्छितात. पण शिवकुमार मात्र त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळेच पक्ष संघटनेतील बदलांच्या चर्चेनंतरही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं नाहीये.
सूत्रांनुसार डी.के. शिवकुमार यांनी सुमारे 100 आमदारांशी संपर्क साधलाय. दरम्यान काँग्रेस आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी २ मार्च रोजी दावा केला होता की, येत्या डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मुख्यमंत्री होतील. ते पुढील किमान ७.५ वर्षे मुख्यमंत्री राहतील. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली म्हणाले की, डीके शिवकुमार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. शिवकुमार यांचे मुख्यमंत्री होणे आधीच निश्चित झालंय, असा दावाही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.