DK Shivakumar addresses the media amid growing speculation over a major cabinet reshuffle in Karnataka Saam Tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेटचा उलटफेर होणार? कुणाला मिळणार संधी? 'ही' नावे चर्चेत

DK Shivakumar On New MLAs In Cabinet: कर्नाटकच्या राजकारणात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी नव्या आमदारांना संधी देण्याचे संकेत दिल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

कर्नाटकच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून अंतर्गत राजकारण चांगलेच पेटले असताना उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनी मोठे विधान केले आहे. मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच आमदारकी भूषवणाऱ्या तथा युवा आमदारांना कॅबिनेटमध्ये संधी मिळावी असे सुतोवाच केले आहे. तसेच पक्षाच्या भवितव्यासाठी देखील हे फायदेशीर राहील असे ही ते म्हणाले.

मागच्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरम्मया आणि डी.के शिवकुमार यांच्यात राजकीय रणकंदन सुरू आहे. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे असा एक आमदारांचा गट देखील आग्रही असून त्यांनी थेट दिल्लीही गाठली होती. अशातच आज बंगलोरमध्ये शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधत पहिल्यांदा जे आमदार झाले आहे त्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळावी असे विधान केल्याने चर्चाना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, बदलत्या पिढीनुसार सरकारमध्ये ही बदल करण्याची गरज आहे असे म्हणत पक्षाला देखील नव्या रक्ताची आणि नवीन विचाराची गरज असून या सगळ्याला माझे समर्थन आहे असे शिवकुमार म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिवकुमार हेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देखील आहे. पुढे ते म्हणाले, जुने लोक नेहमीच राहू शकत नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवकुमार राहुल गांधी आणि काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या इतर अनेक वरिष्ठ नेत्यांना पहिल्यांदाच आमदारांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देत होते, ज्यात प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती.

याआधीही मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासमवेत राज्य नेतृत्वाने दिलेल्या प्रस्तावात नवीन निवडून आलेल्या आमदारांमध्ये कमीत कमी 5 आमदारांना मंत्री बनवावे असे म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत कर्नाटकच्या राजकरणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहे. काँग्रेस हायकमांड काय निर्णय देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत खाणीचा मुद्दा गाजला; ठाकरे आणि राऊत सत्ताधाऱ्यांना भिडले, वनमंत्र्यांकडून एका वाक्यात उत्तर

Maharashtra Live News Update: साताऱ्यात 'कोयता गँग'चा थरार; करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला

टीम इंडियासाठी गुड न्यूज; तगडा खेळाडू पुन्हा संघात परतणार

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियात होणार धक्कादायक उलटफेर, मॅचविनर खेळाडूची विकेट पडणार

लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT