Senior IAS Officer Mahantesh Bilagi and two others died after their car overturned while avoiding a dog near Kalaburagi. saam tv
देश विदेश

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

IAS Officer Mahantesh Bilagi Died In Car Accident: कलबुर्गीजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी, त्यांचा भाऊ आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कार समोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यानंतर कार उलटली.

Bharat Jadhav

  • भीषण अपघातात वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी यांचा मृत्यू

  • अपघातात बिलागी यांचे भाऊ आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

  • लग्न समारंभाला जाताना कार अपघात

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका रस्ते अपघातात राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी यांच्यासह तिघांचा मृत्यू झालाय. वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे एका कौटुंबिक लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला. महांतेश बिलागी हे कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे त्यांचा भाऊ आणि आणखी एका व्यक्तीसह बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून कलबुर्गी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान जेवरगी तालुक्यातील गौनाली क्रॉसजवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या अपघातात महांतेश बिलागी, त्यांचा भाऊ शंकर बिलागी आणि इराणा शिरसांगी यांचा मृत्यू झाला.

वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिल्गी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्व प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून महांतेश बिल्गी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT