ips roopa moudgil-ias rohini sindhuri Saam TV
देश विदेश

IAS-IPS Officer Dispute: कर्नाटकात भिडल्या दोन IAS-IPS अधिकारी; प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याने खळबळ

मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही अधिकाऱ्यांची पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka News: कर्नाटकात दोन महिला IAS आणि IPS अधिकारी यांच्या भांडणानं राज्य प्रशासन हादरलं आहे. परस्परांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही अधिकाऱ्यांची पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खासगी फोटो शेअर करण्यावरून आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगील आणि आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्यात वाद सुरु झाला आहे.

IPS रूपा मौदगल यांनी IAS रोहिणी सिंधुरी यांच्यावर आरोप केला की, जेव्हा रोहिणी मंड्या जिल्हा पंचायत सीईओ बनल्या तेव्हा त्यांच्यावर शौचालयांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप होता. आकडे फुगवून त्यांनी केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळवल्याचा आरोप केला, मात्र याची चौकशी झाली नाही. (Latest News)

चामराजनगरमध्ये ऑक्सिजनशिवाय २४ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोपही डी. रूपा यांनी केला. आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्यावर ठपका ठेवला, मग रोहिणी यांच्यावर कारवाई कशी झाली नाही? डी रूपा यांनी आरोप केला की फेसबुकवर रोहिणी सिंधुरी यांचे खासगी फोटो शेअर केले आहेत. रोहिणी सिंधुरी यांनी पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिची छायाचित्रे पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला.

डी रूपा यांनी आरोप केला आहे की सिंधुरीने 2021 आणि 2022 मध्ये तिची छायाचित्रे तीन अधिकाऱ्यांसोबत शेअर केली होती. डी रूपा यांनी दावा केला की त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली होती.

या प्रकरणावर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, या वादावर पोलीस प्रमुखांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे. आम्ही गप्प बसणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अगदी सामान्य लोक रस्त्यावर असे बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुद्द्यांवर वाट्टेल ते करू द्या, पण मीडियासमोर येऊन असे वागणे योग्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT