Woman Hospitalized After Snake Attack Saam
देश विदेश

सूनेला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

Woman Hospitalized After Snake Attack: हुंड्यासाठी महिलेचा छळ. अंधार खोलीत डांबून ठेवलं. खोलीत साप सोडला. सापानं महिलेचा चावा घेतला.

Bhagyashree Kamble

  • हुंड्यासाठी महिलेला खोलीत डांबून ठेवलं.

  • सासरच्यांनी खोलीत साप सोडला.

  • सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल.

कानपूरच्या कर्नलगंज पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा न दिल्यामुळे पती आणि सासरच्यांनी महिलेला खोलीत डांबून ठेवलं. तसेच खोलीत साप सोडला. सापानं महिलेचा चावा घेतला. महिला ओरडत राहिली. परंतु तिला वाचवण्याऐवजी तिचे सासरचे मंडळी हसत राहिले. माहिती मिळताच बहिणीनं महिलेची सुटका केली, तसेच रूग्णालयात नेलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दाखल तक्रारीनुसार, रेश्माचा विवाह १९ मार्च २०२१ रोजी कर्नलगंज येथील शहनवाज याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी महिलेचा छळ करण्यास सुरूवात केली. कमी हुंडा मिळाल्यामुळे सासरचे मंडळी नाराज होते. महिलेच्या वडिलांनी खोली बांधण्यासाठी दीड लाख रूपये दिले.

त्यानंतर आणखी ५ लाख रूपयांची मागणी केली. ५लाख रूपयांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला वेगळ्या खोलीत झोपण्यास सांगितले. नंतर त्या खोलीत साप सोडण्यात आले. रात्री उशिरा तिच्या पायाला साप चावला. ती वेदनेनं तडफडत होती. मात्र, तिला वाचवायला कुणीच आलं नाही.

नंतर महिलेनं आपल्या बहिणीला फोन करून याची माहिती दिली. तिनं लगेच महिलेला रूग्णालयात नेले. तिच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. यानंतर महिलेच्या बहिणीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती, सासू, सासरे, मेहूणे यांसह सासरच्यांविरोधात विविध कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT